Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजमाता जिजाऊ साहेब पुण्यतिथी 2021 विशेष : राजमातांची छत्रपती शिवाजींना शिकवण आणि काही प्रेरक प्रसंग

Webdunia
गुरूवार, 17 जून 2021 (08:15 IST)
राजमाता जिजामाता भोसले यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाण्याच्या सिंदखेड येथे लखुजी जाधव परिवारात झाला.बालपणातच त्यांचा विवाह 'शहाजी भोसले यांच्याशी झाला.त्या वेळी शहाजी राजे हे आदिलशाही सुलतानाच्या सैन्यात सुंभेदार होते.त्यांना आपल्या पतीचे कोणत्याही मुस्लिम शासकाची गुलामगिरी करणे आवडत नसे.त्या स्वराज्यवादी विचारधारेच्या एक महान स्त्री होत्या,
 
प्रत्येकाला असं वाटतं की छत्रपती शिवाजींचा पुनर्जन्म व्हावा,पण तो शेजारच्या घरात व्हावा,एकमात्र जिजामाता अश्या होत्या ज्यांना असं वाटायचे की त्यांच्या पोटी असा  पुत्र जन्माला यावा जो राष्ट्र संरक्षणासाठी एक सक्षम राष्ट्रनायक म्हणून व्हावा.त्यासाठी त्यांनी स्वतःची घडण अशी केली की त्यांच्या मनावर महाभारत आणि रामायणातील काही तेजस्वी आणि उर्जावान प्रसंग वाचली त्यांच्या वर त्या प्रसंगाची छाप पडली आणि त्यामुळे त्यांनी आपले मन खंबीर केले.त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.त्याकाळी शहाजी भोसले हे निजामाच्या घरी सुभेदार पदावर कार्यरत होते.जिजाऊ मातेला नेहमी असं वाटायचे की शहाजी राजे एवढे पराक्रमी असून देखील त्यांनी एका निजामाकडे गुलामगिरी का करायची ?असं करणे योग्य नाही.
 
त्या स्वराज्यवादी विचारधारेच्या एक महान स्त्री होत्या,त्यांना कोणाची गुलामगिरी करणे आवडत नसे.म्हणून त्यांना नेहमी असे वाटायचे की त्यांच्या पोटी असा पुत्र जन्माला यावा ज्याच्या नावाचा झेंडा त्रिलोकात पसरावा.ज्याने एक हिंदवी साम्राज्य स्थापित करावे आणि एक संवेदनशील राजा जाणता राजा  म्हणून कार्य करावे.जेणे करून हिंदूंवर मुघलांकडून होणारे अत्याचार थांबतील.
 
त्यांनी 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी गडावर सूर्यास्ताच्या वेळी छत्रपती शिवराय म्हणजेच साक्षात शिवाचा महादेवाचा अवतार छत्रपती शिवाजी राजेंना जन्म दिला.
 
 छत्रपती शिवराय हे आपल्या मातोश्रीच्या छत्रछायेखाली लहानाचे मोठे झाले.त्यांनी लहानपणा पासूनच छत्रपती शिवरायांच्या मनात असे संस्कार रुतले जेणे करून ते मोठे होऊन लोक कल्याण कार्याला लागतील आणि एक महान राजे बनतील.जिजाऊ साहेब बाळ शिवरायांना कर्तृत्वान योद्धांच्या गोष्टी सांगायचा,राम,कृष्ण बलाढ्य भीम आणि पराक्रमी अर्जुनाबद्दल सांगायचा. जेणे करून ते देखील त्यांच्या प्रमाणे शूर आणि प्रतापी बनावे.जिजाऊ साहेबांनी शिवरायांना पाळण्यात टाकल्या पासून त्यांनी बाळाला अंगाई म्हणून बाळा निजगडे नसून बाळा उठ गडे उठ उठ शिवराया आक्रांत झाला धर्म  परसत्तेच्या तालात परसत्तेच्या आक्रमणामुळे हिंदवी स्वराज्य परस्वाधीन झाले आहे,त्यामुळे उठा शिवराय आणि एका नवीन हिंदवी स्वराज्याची स्थापना करा.अशी अंगाई म्हणत असे.
 
प्रेरक प्रसंग - छत्रपती शिवराय लहान असताना एकदा ते आपल्या वडिलांसह औरंगजेबाच्या दरबारात गेले त्याकाळी मुस्लिम शासन होतं.त्यामुळे त्यांची भेट राजाशी करण्यासाठी शहाजी राजे आपल्यासह छत्रपती शिवरायांना घेऊन गेले. मोघल शासक जेथे बसलेले होते त्या खोलीचे दार अरुंद होते आणि उंचीला देखील कमी होते.जेणे करून जो व्यक्ती दरबारात प्रवेश करेल त्याने मान वाकवुनच प्रवेश करावे. अशी काही त्या दाराची घडण होती. छत्रपती बाळ शिवरायांना ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी मान न वाकवता प्रथम आपले पाय त्या दरबारात टाकले.नंतर डोकं वाकविले.
 
शहाजींनी घरी आल्यावर घडलेला प्रसंग जिजाउ साहेबाना सांगितला. हे ऐकून आई साहेबांनी छत्रपती शिवरायांना न रागावता त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि म्हणाल्या की आता खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्यासाठी एक खरा नायक निर्माण होतं आहे.जो अन्याच्या विरुद्ध पाऊल चालणार.त्या दिवशी पासून छत्रपती शिवरायांच्या पाठी त्यांच्या आईचा आशीर्वाद होता.
 
पुढे अनेक प्रसंग अशी आली जेव्हा छत्रपतींना आपल्या आई च्या आशीर्वादाची त्यांच्या सल्ल्याची गरज होती.आई साहेब छत्रपती शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या.कोणतेही प्रसंग असो आई साहेबांनी नेहमी छत्रपती शिवरायांचे मार्गदर्शन केले.छत्रपती शिवराय देखील त्यांच्या आईच्या मतानुसार कार्य करायचे .तसेच आपल्या मातेच्या प्रत्येक इच्छेला देखील छत्रपती शिवरायांनी पूर्ण केले.
 
एवढेच नव्हे तर छत्रपतींचे मावळे देखील आई साहेबाना आपल्या आई प्रमाणेच मान देत होते. आऊ साहेब आणि छत्रपती शिवाजींच्या एका शब्दा साठी ते काहीही करण्यास तत्पर असायचे.

असेच एक प्रसंग आहे कोंढाण्याच्या  किल्ल्याचे जे खूप प्रख्यात आहे.
एकदा तानाजी मालसुरे आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आई साहेबांकडे गेले त्यावेळी जिजाऊ माता कोंढाण्याच्या किल्ल्याकडे बघत काही विचारात होत्या. त्यांना तानाजींनी विचारले की आऊ साहेब आपण एवढा काय विचार करीत आहात त्यावर मातोश्री म्हणाल्या की आपल्याला हा कोंढाण्याचा किल्ला मुगलांकडून परत मिळवायचा आहे.असचं होईल आऊ साहेब आपली इच्छेला मान देऊन हा किल्ला आत्ताच मिळवणार. पण तानाजी आपल्या कडे लग्न सोहळा आहे.असं माते त्यांना म्हणाल्या त्यावर ''आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे '' असं म्हणून तानाजीने आपल्या मुलाचे लग्न पुढे ढकलले आणि  तानाजी मालसुरे यांनी कोंढाण्याच्या किल्यावर आक्रमण केले आणि या लढा मध्ये आपले प्राण देऊन कोंढाणाचा  किल्ला मिळविला. त्यावर छत्रपती शिवराय म्हणाले की ''गड आला पण सिंह गेला''

असाच एका प्रसंगी जेव्हा शहाजींच्या निधनानंतर सती होण्यासाठी निघाल्या तेव्हा छत्रपती शिवाजींनी त्यांना अडविले आणि म्हणाले की आऊ साहेब आपण जर सती झाल्या तर धर्माचे पालन तर होईल परंतु राजधर्माचा अस्त होईल म्हणून आपण असं करू नका.आपल्याला राज्यधर्मासाठी जगायचे आहे आणि आम्हाला अजून मार्गदर्शन करायचे आहे. त्यांचे असं म्हणणे ऐकून आऊ साहेबांनी सती न होण्याचे निर्णय घेतले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे देखील मार्गदर्शन दिले. 
 
जर जिजाऊ साहेब यांनी आपल्या मुलाला म्हणजेच छत्रपती शिवाजी राजेंना हिंदवी स्वराज्य स्थापित करण्याची प्रेरणा दिली नसती तर त्या काळात पतनाकडे जाणाऱ्या विजय नगर साम्राज्यात नंतर हिंदू झेंडा सांभाळणाऱ्या छत्रपती शिवाचा जन्मच झाला नसता.धन्य आहे ती माता आणि धन्य आहे ती मातृ शक्ती.या मातृ शक्तीला मानाचा मुजरा. 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

लहान गोष्टी विसरणे हे ब्रेन फॉगची लक्षण आहे का

हिवाळ्यात टाळूला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळाच्या दुधापासून बनवलेले हे 5 हेअर मास्क वापरा

हिवाळ्यातील हे छोटे फळ आरोग्याचा खजिना आहे

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध Essay On Republic Day In Marathi

पुढील लेख
Show comments