rashifal-2026

ऐश्वर्या-अभिषेकला कन्यारत्नाची प्राप्ती

मनोज पोलादे
ND
ऐश्वर्या-अभिषेकच्या अंगणात १६ नोव्हेंबरला 'नन्ही परी' ने पाऊल टाकले आणि 'प्रतीक्षा' बंगला छोट्या बाळाच्या आगमनाने हरखून गेला. जगभरातील प्रसारमाध्यमांनी या शुभागमनाचा पाठपुरावा केला. ऐश्वर्याच्या बाळाचे आगमन ही वैयिक्तिक आयुष्यातील गोष्ट असून त्याबाबत आवश्यक प्रायव्हसी पाळून प्रसारमाध्यमांनी चांगला पायंडा घातला. सेलिब्रिटींच्या सार्वजनिक आणि व्यक्तिगत आयुष्यातील भेद समजण्याचा परिपक्तवपणा प्रसारमाध्यमांनी दाखवला ही २०११ मधील प्रमुख घटना होय.

महानायक अमिताभ बच्चन यांच्याबाबत प्रसारमाध्यमात प्रचंड क्रेझ असल्याने त्यांच्याशी निगडीत लहानसहान गोष्टींचे प्रतिबिंब माध्यमात उमटत असते. त्यातच ऐश्वर्याचीही आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल आहे. या दर्जाच्या सेलिब्रिटींना पुत्रप्राप्ती ही घटना प्रसारमाध्यमांसाठी निश्चितच पर्वणी आहे. २००६ मध्ये अभिषेक-ऐश'च्या विवाहाचेही प्रसारमाध्यमांनी इंत्यभूत वार्तांकन केले होते. दोघांची भूमिका असलेला मणिरत्म यांचा 'गुरू' नुकताच प्रदर्शित झाला होता. त्यातच साखरपुड्याची बातमी आली आणि नंतर लग्नही पार पडले. प्रसारमाध्यमांनी हा सोहळा चांगलाच साजरा केला आणि प्रचंड टीआरपी झोळीत पाडून घेतले.

मात्र प्रसुती आणि बाळाचे आगमन ही गोष्ट यापेक्षा वेगळी आहे. याचे वार्तांकण करताना तथ्याशी फारकत घेता येत नाही. स्त्रीत्वाचा सोहळा समजल्या जाणार्‍या या प्रसंगाचे 'फिक्शन'चा तडका देऊन वार्ताकण केल्यास माध्यमांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहावे लागेल. बच्चन कुटुंबीयांसोबतच देशवासीयांनाही हे आवडणार नाही आणि नैतिक मुल्यांच्या दृष्टिनेही प्रसारमाध्यमांसाठी हे अयोग्य ठरेल.

या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांनी प्रसारमाध्यमांना प्रायव्हसीचा आदर करण्याचे आवाहन केले होते. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या एडिटर्स गिल्डने या आवाहनाचा आदर राखत वार्तांकनाबाबत गाइडलाइन्स जारी करण्यासोबत शब्दप्रामाण्यवाद राखत वचनपूर्ती केली.

बच्चन कुटुंबीयांनी ऐश्वर्याची प्रसुती आणि बाळाच्या आगमनाबाबत आवश्यक सार्वजनिक माहिती 'ट्विटर' आणि 'प्रतीक्षा'वर घेतलेल्या पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून दिली. इतर कोणत्याही माध्यमातून माहिती प्रसुत होणार नाही, याची पूर्ण दखल घेण्यात आली. ऐश्वर्यास प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलेल्या 'सेव्हन हिल्स' रूग्णालय प्रशासनासही याबाबत सख्त बजावण्यात आले होते.

प्रसारमाध्यमांनी परिपक्वता दाखवत त्यांच्या मताचा आदर करून चांगला पायंडा घालवून दिला. सेलिब्रिटींच्या सार्वजनिक आणि व्यक्तिगत आयुष्यातील भेद समजण्याचा परिपक्तवपणा प्रसारमाध्यमांनी दाखवला, ही निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

रेल्वेने भाडेवाढीची घोषणा केली, एसी तसेच जनरल क्लासच्या किमती वाढल्या

Maharashtra Local Body Election Result 2025 LIVE: महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आज

मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे संकेत दिले

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये बारमधील लोकांवर अंदाधुंद गोळीबार; नऊ जणांचा मृत्यू

288 नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार

Show comments