आज पासून नवरात्री सुरु झाली आहे. तसेच अनेक जण नवरात्रीचे दहा दिवस उपवास ठेवत असतात. तसेच अनेक वेळेस उपवसाचा काय पदार्थ बनवावा हे काळत नाही. याकरिता आज आपण उपवासाचा एक पदार्थ पाहणार आहोत. स्वादिष्ट आणि झटपट बनणार पावसाचा हा पदार्थ आहे दही आलू रेसिपी. तर चला लिहून घ्या दही आलू रेसिपी.
साहित्य-
चार बटाटे उकडलेले
एक कप दही
एक चमचा तूप
एक चमचा जिरे
तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
एक चमचा सेंधव मीठ
अर्धा चमचा मिरे पूड
एक चमचा कोथिंबीर बारीक चिरलेली
कृती-
सर्वात आधी उकडलेले बटाट्ट्यांच्या काप करून घ्यावा. आता एका कढईमध्ये तूप घालून जीरे घालावे. तसेच आता यामध्ये मिरचीचे तुकडे घालावे. आता बटाटे काप घालावे, व परतवून घ्यावे. तसेच आता यामध्ये फेटलेले दही घालावे. व मिक्स करावे. नंतर सेंधव मीठ आणि काळी मिरे पूड घालावी. आता हे मिश्रण दोन ते तीन मिनिट शिजवावे. आता यामध्ये कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे आपला उपवासाचा पदार्थ दही आलू रेसिपी. थालीपीठ सोबत नक्कीच सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.