Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रावण विशेष : श्रावणात बनवा खाण्यासाठी चविष्ट साबुदाणा कटलेट

श्रावण विशेष : श्रावणात बनवा खाण्यासाठी चविष्ट साबुदाणा कटलेट
Webdunia
मंगळवार, 14 जुलै 2020 (09:11 IST)
साहित्य : 250 ग्राम उकडलेले बटाटे, 1 कप साबुदाणा, सैंधव मीठ आणि काळी मिरपूड पावडर चवीप्रमाणे, 1/2 कप भाजलेले शेंगदाणे, 2-3 हिरव्या मिरच्या, 1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1/2 लिंबू , तळण्यासाठी शेंगदाण्याचे तेल किंवा तूप.
 
कृती : सर्वप्रथम साबुदाण्याला धुऊन पाण्यात भिजवून ठेवा. थोड्यावेळानंतर त्यातले पाणी उपसून 1-2 तासांसाठी ठेवून द्या. शेंगदाण्यांना बारीक वाटून त्याचे कूट करा. बटाटे  सोलून त्याला मॅश करून घ्या. यामध्ये साबुदाणा, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, सैंधव मीठ, काळीमिरी पावडर, लिंबाचा रस आणि शेंगदाण्याचे कूट टाकून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या आणि सारण तयार करावं.
 
आता एक कढईत तेल किंवा तूप गरम करावं. साबुदाणा-बटाट्याच्या मिश्रणाच्या छोट्या-छोट्या गोळ्या बनवून हळुवारपणे हाताने चपटा आकार द्या. आता मंद आंचेवर तांबूस रंग येई पर्यंत तळून घ्या. खमंग खुसखुशीत चविष्ट गरम-गरम साबुदाणा कटलेट तयार. हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

होळीला बनवा चॉकलेट करंजी रेसिपी

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पायऱ्यांच्या मदतीने करा हे ३ व्यायाम, जिममध्ये जाण्याची गरज पडणार नाही

सनबर्नसाठी हा परिपूर्ण आयुर्वेदिक उपचार आहे

हुला हूपसह करा हे 5 मजेदार व्यायाम, कंबरेवरील चरबी क्षणार्धात निघून जाईल

पुढील लेख
Show comments