rashifal-2026

दिवाणखान्यास होऊ द्या फेंगशुईचा स्पर्श

Webdunia
मंगळवार, 26 जून 2012 (17:33 IST)
WD
घरातील सोपा किंवा दिवाणखाना म्हणजे सगळ्यांची भेटण्याची जागा असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रत्येकाचे खासगीपण विरघळते अशी ही खोली असते. भावनांचे प्रकटीकरण या खोलीतच होते. राग, लोभ, द्वेष, आनंद, उत्साह येथे प्रकट होतात. सुख-दुःखाची देवाणघेवाण या खोलीत होते. त्यामुळे या खोलीतील वातावरण चांगले राखणे आवश्यक आहे. थोडक्यात प्रेमाचे यांगसारखे घट्ट आवरण या खोलीभोवती असले पाहिजे.

या खोलीत पांढऱे किंवा सोनेरी गोल घड्याळ असल्यास चांगले. ते शुभ प्रतीक आहे. घराच्या पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेच्या भिंतीवर असावे. सर्वांत चांगली जागा म्हणजे खोलीच्या डाव्या बाजूला. या खोलीत प्रवेश करण्याचे दार ज्या भिंतीला आहे, त्याच भिंतीवर हे घड्याळ असल्यास उत्तम.

दिवाणखान्यातील चित्र े
चित्रे आपल्याशी बोलतात. अनेक घटनांचे संकेत देतात. त्यांच्यावर आपली मनस्थिती अनेकदा अवलंबून असते. त्यामुळे दिवाणखान्यात कोणते चित्र असावे हे फार महत्त्वाचे आहे. खालील बाबी यासाठी लक्षात ठेवा.
1. पाण्यातील माशाचे चित्र दीर्घायुष्याचा संकेत देते.
2. मेंढीचे चित्र नशिबाचे प्रतीक आहे.
3. सूर्योदय, पर्वत किंवा पाणी दाखविणारी निसर्गचित्रे आशादायी मनोवृत्ती दर्शवितात.
4. धबधबा वगैरेची चित्रे शुभलक्षणाचे प्रतीक आहेत.
5. आनंदी, उत्साही, हसतमुख व्यक्तींचे चित्र पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करतात.
6. डार्क, करडे रंग असलेले चित्र आजारी प्रकृतीचे प्रतीक आहे. आजारी पाडण्याची क्षमताही अशा चित्रात असते.
7. भौमितिक आकारातील चित्रे विध्वसंक विचार वाढवितात.
8. चित्रांमध्ये लाल रंग जास्त वापरलेला असल्यास संताप वाढविण्यास तो उद्युक्त करतो.
9. क्रूर, जंगली प्राणी दाखविणारी चित्रे प्रकृती अस्वास्थ्यास कारणीभूत ठरतात.

दिवाणखान्यातील रोप े
कोणतेही नैसर्गिक रोप दिवाणखान्यास असल्याचा त्याचा परिणाम चांगलाच असतो. पॉझिटिव्ह ऊर्जा त्यातून बाहेर पडते. घरात रहाणाऱ्यांवर त्याचा अर्थातच चांगला परिणाम घडतो. फक्त एकच पाळावे कॅक्टस म्हणजे निवडूंग घरात ठेवू नये. निवडूंगातील शुष्कपणा, त्याचे काटे यांचा प्रभाव आपल्या जीवनावर पडू शकतो. प्लास्टिक किंवा कृत्रिम रोपे लावल्याने काही फरक पडत नाही.

सर्व पहा

नवीन

आरती मंगळवारची

मंगळवारी जेवणात हा पदार्थ नक्की बनवा, जीवनात सकारात्मकता येईल

मंगळवारी उपवास करताना टाळाव्यात अशा ५ चुका

Neem Karoli Baba कैंची धाम येथे 'फॅमिली मॅन' अभिनेता मनोज बाजपेयी यांचे आयुष्य बदलले, बाबांच्या चमत्कारांनी थक्क झाले

Ravanakrutam Shivatandava Stotram रावणकृतं शिवताण्डव स्तोत्रम्

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

Show comments