Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कलेचा वारसा जपण्यासाठीचा संघर्ष : 'आजा नच ले'

वेबदुनिया
निर्माता : आदित्य चोप्रा
दिग्दर्शक : अनिल मेहता
पटकथा, संवाद : जयदीप साहनी
गीत : जयदीप साहनी, पियुष मिश्रा
संगित : सलीम सुलेमान
कलाकार : माधुरी दीक्षित, कोंकणा सेन, कुणाल कपूर, रघुवीर यादव, दिव्या दत्ता, विनय पाठक, रणवीर शौरी, अखिलेंद्र मिश्रा, जुगल हंसराज.

PRPR
बॉलीवूडची (एकेकाळची) धडकन माधुरी दीक्षित तब्बल पाच वर्षांनंतर 'आजा नच ले' या चित्रपटाच्या माध्यमातून पुनरागमन करत आहे. माधुरीचे बलस्थान नृत्य आहे. तेच हेरून तशाच प्रकारची ही भूमिका आहे. या चित्रपटात नृत्य कलेसाठी झटणार्‍या शिष्येची भूमिका माधुरीने केली आहे. न्यूयॉर्कमध्ये नृत्यसाधनेत व्यग्र दि‍यास तिच्या जन्मगावातून गुरू मकरंद (दर्शन जरीवाला) अत्यवस्थ असल्याचा दूरध्वनी येतो. दिया या गावातच लहानाची मोठी झालेली आहे.

नृत्याचे प्रारंभिक घडे तिने या गुरूंच्याच मार्गदर्शनाखाली गिरवले. त्यामुळे साहजिकच हृदयाच्या कप्प्यात गावाविषयी हळवा कोपरा आहे.

त्यामुळे गुरूंविषयीचे वृत्त कानी पडताच तिकडच्या आठवणींनी ‍दिय ा
PRPR
अस्वस्थ होते. पण गावात पोहोचण्याआधीच गुरूंचा मृत्यु होतो. यानंतरचा काळ तिची कसोटी घेणारा ठरतो. गुरू मकरंद चालवत असलेले अजंता थिएटर बंद करण्याची योजना तिच्या कानी पडते. या संस्थेतूनच धडे घेऊन दियाची कारकिर्द घडलेली अते. त्यामुळे ही संस्था वाचविण्यासाठी संघर्ष करण्याचा ती निर्णय घेते.

अजंता थिएटरवर स्थानिक राजकीय नेत्याची नजर आहे. तेथे व्यावसायिक इमारत उभी करण्याचा त्याचा प्लॅन असतो. त्यासाठी ही जागा बळकावण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

PRPR
मात्र, दिया अजंता थिएटर वाचविण्यासाठी कंबर कसते. त्यासाठी तिला डॉ. रघुवीर यादव मदतीसाठी धावून येतो. दियाच्या संघर्षात इमरान (कुणाल कपूर), अनोखी (कोंकणा सेन शर्मा), स्थानिक नेता चौधरी ओमसिंह (अखिलेंद्र मिश्रा), चहाची टपरी चालवणारा मोहन शर्मा (रणवीर शौरी़), जबाबदार सरकारी अधिकारी विनय पाठक व विमा एजंट संजीव मेहता (जुगल हंसराज) सामिल होतात. दिया संघर्षात यशस्वी होते का? यासाठी 'आजा नच ले' बघावा लागेल.

चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांची शिक्षा, ४.७५ लाख रुपये दंड, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बॉलिवूडमध्ये घबराट पसरली! कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमो डिसूझा यांना धमकी, पोलिसांनी तपास सुरु केला

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवच्या वडिलांचे निधन

श्रद्धा कपूरने वडील शक्ती कपूर सोबत मुंबईत खरेदी केले घर, किंमत जाणून आश्चर्य होईल

Dyslexia या आजारामुळे अभिषेक बच्चन नीट बोलू शकत नव्हते, कारण आणि लक्षणे जाणून घ्या

आयुष्मान खुराना बनले FICCI फ्रेम्सचा ब्रँड ॲम्बेसेडर

एल्विश यादव विरोधात गाझियाबाद न्यायालया कडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

हा महादेव आणि महाकालीचा आदेश होता, मी काही केले नाही', ममता कुलकर्णीने दिली प्रतिक्रया

प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती आज आपला 67 वा वाढदिवस साजरा करीत आहे

पशुपतिनाथ मंदिर काठमांडू

Show comments