Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्टुडंट ऑफ द ईयर 2 चा पोस्टर झाला रिलीझ, जाणून घ्या रिलीझ डेट

स्टुडंट ऑफ द ईयर 2 चा पोस्टर झाला रिलीझ, जाणून घ्या रिलीझ डेट
, बुधवार, 10 एप्रिल 2019 (20:00 IST)
2012 मध्ये रिलीझ झालेली वरुण धवन, अलिआ भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत चित्रपट स्टूडंट ऑफ द ईयर बॉक्स ऑफिसवर हिट राहिली होती. आता करण जोहरने त्याचा सीक्वल स्टुडंट ऑफ द ईयर 2 बनवले आहे. या चित्रपटात नवीन स्टूडंट टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया दिसणार आहे. 
 
12 एप्रिलला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ होणार आहे. अलीकडे या चित्रपटाचे 2 पोस्टर्स रिलीझ केले गेले आहे. पहिल्या पोस्टरमध्ये खेळाच्या मैदानात दोन स्पोर्ट्स शूजसह चित्रपटाचे कलाकार एकमेकांना टक्कर देत आहे तर तिथेच, दुसऱ्या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफ कॉलेजमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. दुसरा पोस्टर शेअर करताना करण जोहरने लिहिले, 2019 चा बॅच या गेटने प्रवेश करण्यास तयार आहे आणि यावेळी ते पुरेसे मोठे होणार आहे. 
 
हा चित्रपट 10 मे 2019 रोजी रिलीझ होणार आहे. स्टुडंट ऑफ द ईयर 2 मधून दोन हसीना अनन्य पांडे आणि तारा सुतारिया बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळवणार आहे. पुनीत मल्होत्रा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे जेव्हा की लेजेंड फिल्म निर्माता करण जोहरच्या बॅनर धर्मा प्रॉडक्शनद्वारे तयार केले गेले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाने स्थगिती