suvichar

दिल धडकने दो

Webdunia
बुधवार, 23 जुलै 2014 (15:48 IST)
अभिनेता फरहान अख्तर याची बहीण आणि दिग्दर्शिका जोया अख्तर हिचा आगामी सिनेमा ‘दिल धडकने दो’ आता लोकांसमोर येण्यासाठी जवळ जवळ तयार आहे. याच सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. हा सिनेमा क्रूझवर शूट केला गेलाय आणि पोस्टरमध्ये सिनेमाची स्टारकास्ट क्रूझवर आराम  करताना दिसतेय.

या सिनेमात प्रियांका चोपडा, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नात्यांची गुंतागुंत हा या सिनेमाच्या कथेचा मुख्य विषय आहे. मुख्य म्हणजे, या सिनेमात रणवीर सिंह आणि प्रियांका चोपडा एकमेकांचे भाऊ-बहीण म्हणून दिसणार आहेत. जोयानं यापूर्वी ‘जिंदगी ना मिलेगी  दोबारा’ या सिनेमाचंही दिग्दर्शन केलंय आणि या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर एकच धुमाकूळ घातला होता. ‘दिल धडकने दो’ हा सिनेमा 5 जून 2015 रोजी प्रदर्शित होणार आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

निर्मात्यानं नदीत उडी घेत आयु्ष्य संपवलं; वयाच्या ८५ व्या वर्षी जगाचा निरोप

सलमान खानने त्याच्या चित्रपट निवडीच्या प्रक्रियेबद्दल सांगितले की – मी पटकथा वाचत नाही, मी फक्त ती ऐकतो

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

Show comments