Dharma Sangrah

फूंक

वेबदुनिया
IFMIFM
निर्माता : आझम खान
‍ दिग्दर्शक : रामगोपाल वर्मा
संगीत : अमर मोहिले
कलाकार : सुदीप, अमृता खानविलकर, अहसास चन्ना, ज्योती सुभाष, अश्विनी काळसेकर.

जादूटोणा अथवा अघोरी विद्या यावर विश्वास ठेवणारी मंडळी समाजात बरीच आहेत. या विद्या आहेत किंवा नाहीत याहीपेक्षा त्यामुळे वाटणारे भय ही एक स्वतंत्र भावना आहे. हीच भावना 'कॅश' करण्यात रामगोपाल वर्मा आजपर्यंत बर्‍याच प्रमाणात यशस्वी ठरला आहे. 'रात'पासून त्याने 'भय' या थीमवर अनेक चित्रपट काढले. ते बर्‍यापैकी यशस्वीही ठरले. आता त्याचा फूंक हा नवा चित्रपट येत आहे.

IFMIFM
काही घटना अशा घडतात की आपण त्याचा स्वप्नातही विचार केलेला नसतो. याला योगायोगही म्हणू शकत नाही. कारण या गोष्टींची फारशी माहिती आपल्याला नसते. मानवी जीवनात अशी अनेक रहस्ये असतात. आपल्याला डोळे असूनही ती दृष्टीस पडत नाहीत. अशाच रहस्यांभोवती राम गोपाल वर्माने 'फूंक' गुंफला आहे.

‘फूंक’ मध्ये अशाच रहस्यमय घटना आहेत. याचे कथानक एका छोट्या कुटुंबाभोवती फिरते. राजीव एक यशस्वी इंजिनियर आहे. पत्‍नी व दोन मुलगे असा लहानसा त्याचा परिवार आहे. राजीवचा परमेश्वरावर विश्वास नाही. परमेश्वर आणि अशा गूढ, रहस्यमय घटनांवर विश्वास ठेवणार्‍यांवर त्याचा राग आहे.

एके दिवशी राजीवच्या घरात एक दुष्ट आत्मा प्रवेश करतो व त्याच्या कुटुंबाचा नाश करण्याची धमकी देते. या घटनेने राजीवच्या विचारांमध्ये कमालीचे परिवर्तन घडून येते.

IFMIFM
रामूने याद्वारे विचित्र घटनांचा वेध घेतला आहे. या घटनांवर आपला विश्वास असो नसो, पण रामूची मांडणी अशी असते की त्यावर कळत नकळत विश्वास ठेवतो. 'फूंक'ही तसाच असेल अशी अपेक्षा आहे.

जॉर्जकुट्टी पुन्हा एकदा पोलिसांना चकमा देण्यासाठी सज्ज, मोहनलालचा 'दृश्यम ३' या दिवशी थिएटरमध्ये येणार

ओ रोमियो' रिव्ह्यू: शाहिद-तृप्तीचा दमदार अभिनय आणि विशालचा अ‍ॅनिमल हँगओव्हर

राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या जुळ्या मुलांची नावे ठेवली, त्यांचा आध्यात्मिक अर्थ जाणून घ्या

"जय हनुमान" चा भव्य लाँच हम्पीच्या ऐतिहासिक भूमीत होणार आहे, ज्यामध्ये ऋषभ शेट्टी भगवान हनुमानाची भूमिका साकारणार

राजपाल यादव यांच्या मदतीला सोनू सूद गेले धावून; म्हणाले- इंडस्ट्रीने त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे

अभिनेता राजपाल यादव यांना जामीन मंजूर

अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या

रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने राजस्थानमधून सहा आरोपींना अटक केली

Dadasaheb Phalke Punyatithi 2026 "भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके: शून्यातून विश्व कसं निर्माण केलं? वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास!"

लोकप्रिय ओडिया गायिका गीता पटनायक यांचे निधन

Show comments