Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Movie Review: राजपूतांची गौरवगाथा दाखवणारी 'पद्मावत'

Webdunia
डायरेक्टर संजय लीला भंसाळीचे बहुप्रतीक्षित चित्रपट 'पद्मावत'ची सुरुवात बरेच डिस्क्लेमर्ससोबत होते. या डिस्क्लेमरमध्ये सारखे सारखे स्पष्ट करण्यात आले आहे की चित्रपटाच्या कथेच्या इतिहासाशी काही घेणे देणे नाही आहे. असे ही सांगण्यात आले आहे की याची कथा फेमस कवी मलिक मोहम्मद जायसी यांच्या काव्य रचना 'पद्मावत'वर आधारित आहे.  
 
अशी आहे 'पद्मावत'ची कथा 
- राजपूतांची गौरवगाथा सांगणाऱ्या ‘पद्मावत’मध्ये राणी पद्मावती, महारावल रतन सिंह यांची प्रेमकथा आणि क्रूरकर्मा अलाउद्दीन खिल्जीच्या वाईट मनसुब्यांचे चित्रण करण्यात आले. सौंदर्यवती असलेली सिंघलची राजकुमारी पद्मावतीला पाहताच क्षणी मेवाडचे राजा महारावल रतन सिंह प्रेमात पडतात. विवाहित असलेले महारावल रतन सिंह पद्मावतीशी दुसरं लग्न करतात.  
 
- पण, खिलजी आपल्या योजनेत यशस्वी ठरतो का? आणि महाराणी पद्मावती जोहाराचा निर्णय घेण्यासाठी का मजबूर होते? असे बरेच प्रश्न तुमच्या मनात येत असतील. पण याचे उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला हे चित्रपट बघावे लागणार आहे.  
असे आहे भन्साळी यांचे डायरेक्शन 
‘पद्मावत’मध्ये भन्साळी पुन्हा एकदा त्यांच्या दिग्दर्शनाची छाप सोडतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चित्रपटातील प्रत्येक दृश्य अगदी मनात आणि एखाद्या फोटो फ्रेममध्ये साठवून ठेवावं असंच आहे. त्यासाठी छायांकनाची प्रशंसा झालीच पाहिजे. त्याशिवाय स्पेशल इफेक्ट्सचा बळावर उभं राहिलेलं हे साम्राज्य म्हणजे तंत्रज्ञान आणि कलात्मकता यांची अद्वितीय सांगडच म्हणावी लागेल. कथेचा शेवट जरी माहीत असला तरी त्यातील थरार टिकून राहतो. एकंदरीत अगदी शंभर टक्के नसला तरी भन्साळींचा हा चित्रपट पूर्ण वेळ प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरणारा आहे.
 
अशी आहे स्टारकास्टची अॅक्टिंग
राणी पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या दीपिकाचा मध्यांतरानंतरचा अभिनय प्रशंसनीय ठरतो. तर शाहिद कपूरने साकारलेल्या महारावल रतन सिंहच्या भूमिकेत स्थिरता जाणवते. मात्र सुरुवातीपासून शेवटापर्यंत लक्ष वेधून घेणारा अभिनय अलाउद्दीन खिल्जी साकारणाऱ्या रणवीर सिंगचा ठरतो. नजरेतील क्रोधाग्नी, स्वभावातील क्रूरता चेहऱ्यावर आणण्याचे रणवीरचे कौशल्य थक्क करणारे आहे. या तीन मुख्य भूमिकांसोबतच सहाय्यक भूमिकांचीही कामगिरी उल्लेखनीय ठरते. विशेषकरून जिम सर्भ आणि अदिती राव हैदरी यांच्या भूमिका. थोड्याच वेळासाठी झळकलेली अदितीसुद्धा तिची एक वेगळी छाप सोडते.
असे आहे 'पद्मावती'चे म्युझिक
चित्रपटातील गाणी आणि पार्श्वसंगीतामध्ये राजस्थानी बाज जपण्यात आला आहे.  पण, त्यासोबतच खिल्जीच्या अय्याशीची ओळख करून देणारी आणि त्याच्या क्रूरतेला अधोरेखित करणारी गाणीसुद्धा ‘क्या बात’म्हणायला भाग पाडतात. 
 
बघावे की नाही? 
हे चित्रपट तुम्हाला नक्कीच बघायला पाहिजे. चित्रपटात राजपूतांच्या शौर्याला बघायला मिळणार आहे. रानी पद्मावतीच्या सुंदरतेसोबत तिचा पराक्रम देखील तुम्हाला आश्चर्यात टाकेल. 

रेटिंग : 3.5

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

सर्व पहा

नवीन

Netflix Down भारत आणि अमेरिकेत नेटफ्लिक्स डाऊन, हजारो यूजर्स नाराज

कांगुवा' अभिनेत्री दिशा पाटनीच्या वडिलांची 25 लाखांची फसवणूक

शनि शिंगणापूर असे एक गाव जीथे घरांना दरवाजेच नाही

रॅपर बादशाहचे नवीन गाणे मोरनी रिलीज

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

पुढील लेख
Show comments