Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईच्या धैर्याला बॉलीवूडचा सलाम!

वेबदुनिया
सोमवार, 23 नोव्हेंबर 2009 (18:50 IST)
ND
ND
मुंबईत 26/11 ला झालेल्या हल्ल्याने नेहमीच ताजे-टवटवीत असणारे बॉलीवूडही हादरले. म्हणूनच या घटनेनंतर आपले ग्लॅमर बाजूला फेकत ही मंडळी मदतीसाठी पुढे सरसावली होती. आता या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना बॉलीवूड पुन्हा एकदा कर्तव्याला जागले आहे.

26 /11 च्या काळात आणि त्यानंतरही मुंबईकरांनी दाखविलेल्या धैर्याला सलाम करण्यासाठी एक गीत तयार करण्यात आले आहे. यात अनेक गायकांसोबत महानायक अमिताभ बच्चननेही आवाज दिला आहे. यातून या हल्ल्यात मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

बिग बीला या गाण्याविषयी सांगितले त्यावेळी ते लगेचच तयार झाले. 'बिग बी'चे मुंबईवर अपार प्रेम आहेच. त्यामुळेच संकट आल्यानंतर मुंबई कोसळत नाही, चालत रहाते. हेच मुंबईचे स्पिरीट आहे, असे ते मानतात.

साऊंड ऑफ पीस नावाचा हा अल्बम या निमित्ताने तयार होतो आहे. त्याचे संगीत आदेश श्रीवास्तव यांनी दिले आहे. यात जागतिक दहशतवादावर टिप्पणी करण्यात आली आहे. अमिताभशिवाय सोनू निगम, हरिहरन, कैलाश खेर, सुरेश वाडकर, जगजीत सिंह, सुनीधी चौहान, शंकर महादेवन, रशिद खान, अलका याज्ञिक यांच्यासह अनेकांनी त्यासाठी आवाज दिला आहे.

या गीताचा व्हिडीयोही तयार करण्यात येत असून त्यात मुंबई हल्ल्यासोबतच अमेरिकेतील 9/11 चा हल्ला आणि लंडन स्फोटाची क्लिपिंग्ज दाखवली जाणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव व आदित्य ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

उद्धव व आदित्य ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

भुवनेश्वरच्या एम्समध्ये वृद्ध रुग्णाची गळफास लावून आत्महत्या

1 जानेवारीपासून या शहरात भिकाऱ्यांना पैसे दिल्यास तुरुंगात जाल, जाणून घ्या नवा कायदा

काय असेल महायुतीतील मतविभाजनाचे सूत्र ? महाराष्ट्रातील विभागांच्या विभाजनाबाबत चर्चा सुरु

Show comments