Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गणपतीचे विविध नाव व त्यांचे अर्थ

वेबदुनिया
तरुण - शाश्वत
गजेंद्र - गजराज

अमित - सर्वोत्तम
भुपती - देवांचा राजा

बुद्धीदाता - बुद्धीचा देवता
तामिळनाडूत आजही गणपतीला ब्रह्मणस्पत‍ी म्हणतात.


नंदना - शंकराचा पुत्र असल्याने त्याचे नाव नंदना पडले.

शंभवी - पार्वतीचे पुत्र असल्याने त्याचे नाव शंभवी पडले.

विघ्नेश्वर शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपती असा आहे.

विनायक - शब्दाचा अर्थ म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे .

WD
धूम्रकेतु - द्बिभूज अथवा चतुर्भूज व धूम्रवर्णी अवतार. वाहन निळा घोडा.

श्वेता - पांढर्‍या रंगासारखा पवित्र असल्यामुळे याचे नाव श्वेता पडले.

रुद्रप्रिया - भगवान शिवचे प्रिय असल्यामुळे त्याचे नाव रुद्रप्रिया पडले.

विकट - विकट नावाचा प्रसिद्ध अवतार कामासुराचा संहारक आहे. मयूर त्याचे वाहन आहे.

महोदर - महोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर (पोट) असणारा. याचे मूषकवाहन आहे .

गजानन - गजानन अवतार सांख्यब्रह्म धारक आहे. त्याला लोभासुर आणि मूषक वाहन असेही म्हटले आहे.

गणपतीला काही ठिकाणी गृत्सम द असेही म्हटले आहे. 'मदस्राव करणारा हत्ती' असा या शब्दाचा अर्थ.

सकल बाधांचा एकच्छत्र अधिपती व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस विघ्नाधिपती हे नाम प्राप्त झाले.



एकदन् त - एकदंतावतार हा ब्रह्माधारक असून तो मदासुराचा वध करणारा आहे. त्याचे वाहन मूषक आहे.

गणपती म्हणजे गणाचा स्वाम ी. धड मानवाचे व शिर हत्तीचे असा हा एक विचित्र व वैशिष्ट्यपूर्ण देव.

गणपत्यथर्वशीर्षात गणपतीला ' नमो व्रातपतये' असे नमन केले आहे. व्रातपती म्हणजे व्रात्यांचा पती.

कश्यप व अदिती यांच्या सन्तान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपे य नावाने प्रसिद्ध झाला.

लम्बोद र - लंबोदराचा अवतार हा क्रोधासुराचा विनाश करणारा आहे. लम्बोदर शब्दांचा अर्थ मोठे उदर (पोट) असणारा .

धुम्रवर्ण अवतार अभिमानासुराचा नाश करणारा आहे. तो शिवब्रह्म स्वरूप आहे. त्याला मूषक वाहन असेही म्हटले जाते.

गणपतीने ब्राम्हणाच्या वेशात येऊन बल्लाळला दर्शन दिले. तेव्हापासून येथील गणपती बल्लाळेश्व र नावाने प्रसिध्द झाला.

वक्रतुण्ड म्हणजे ज्याचे तुण्ड (तोंड) वक्र वा वाकडे आहे तो. गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव.

डोक्यावर चंद्र, तिसरा डोळा व नागभूषणे ही शिवाची वैशिष्ट्ये होत. ही तीनही गणेशमूर्तीतही आढळतात. गणेशाला भालचंद्र असे नाव आहे.

WD
गणपतीच्या गळ्यात कपिलमुनींनी रत्न चढवले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.

गणेश शब्दाचा अर्थ गणांचा- ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपती म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे.

ॐकार - या एकाक्षर ब्रह्मात वरचा भाग गणेशाचे मस्तक, खालचा भाग उदर, अर्धचंद्र लाडू व मागची अर्धवर्तुळाकार रेघ म्हणजे सोंड असे म्हटले आहे.

एकदा एका विवाहाप्रसंगी पार्वती गप्पा करता करता हसली आणि तिच्या हास्यातून एक पर्वतासमान महान पुरूषाचा जन्म झाला त्याचे नाव विघ्नरा ज झाले.



मयूरेश्व र - हा षडभूज व श्वेतवर्णी अवतार आहे. वाहन मोर. त्रेता युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंधू दैत्याच्या वध केला.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नवीन

मंगळवारी हनुमान चालीसा पठण किती वेळा करावे?

सद्गुरु श्री गजानन महाराज आरती मराठी

आरती सोमवारची

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

Show comments