Festival Posters

हरतालिका पूजा कशी करावी

Webdunia
Hartalika Tritiya 2025 Puja Vidhi हरितालिका संपूर्ण पूजा विधी साहित्य आणि मंत्रासह

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका` असे म्हणतात.या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे. रांगोली काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.

ALSO READ: Hartalika Aarti Marathi हरतालिका आरती मराठी
 
सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी. सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे: चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्‍या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये. याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, व झाडांची पाने.

हरतालिका व्रत नियम पाळल्यास नक्की फळ प्राप्ती होईल
 
पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे: बेल, आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छितत वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते चाटावे. दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करावी.

हरतालिकेची कहाणी, शंकराने पार्वतीला सांगितलेली कथा Hartalika Katha

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शिवपुराणानुसार भगवान शिवाने मृत्यूची ही ८ लक्षणे सांगतिली आहेत

Mauni Amavasya 2026 मौनी अमावस्येला दुर्मिळ योगायोग: पितृदोषापासून मुक्तीसाठी सर्वात खास उपाय

How to Fly a Kite मकर संक्रांतीला पतंग कसा उडवायचा, मांजा आणि फिरकीसह पतंगांच्या प्रकारांबद्दल जाणून घ्या

मकर संक्रांती 2026 रोजी तुमच्या राशीनुसार हे विशेष उपाय करा

सण आला हा संक्रांतीचा कविता

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments