(गीति) देव-गजानन यांना, वरेण्य पुसतो उपासना दोन । पहिली अक्षर ऐसी, दुसरी ती मूर्तिमान या दोन ॥१॥ यांतिल मान्य कवन ती, करणें यास्तव सुयोग्य सांगावी । १।२. आपण ईश्वरसाक्षी, आहां सर्वज्ञ म्हणुन सांगावी ॥२॥ गणपति म्हणे नृपाला, सगुण असें मी म्हणून मम भक्ती ।...