rashifal-2026

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीने उंदराला आपले वाहन का बनवले

Webdunia
सोमवार, 25 ऑगस्ट 2025 (12:03 IST)
freepik
गणपतीची कोणतीही मूर्ती पाहिली तरी गणपतीबाप्पांच्या पायाशी वाहन म्हणून असलेला मूषक किंवा उंदीर दिसतोच. उंदीर हेच गणपतीचे वाहन म्हणून आपण मानतो. याबद्दल एक कहाणी या प्रकारे आहे:
ALSO READ: Ganesh Chaturthi 2025 : भगवान गणेशाला एकदंत का म्हणतात
एकदा इंद्रसभेत गंभीर विषयावर चर्चा सुरू होती परंतू क्रौंच नावाच्या गंधर्वाचे मन अजून कुठेतरी रंगलेले होते. क्रौंच तेथे उपस्थित असलेल्या अप्सरांसोबत थट्टा करत होते. हे बघून इंद्र नाराज झाले आणि त्यांनी गंधर्वाला शाप दिला, की आता तू उंदीर होशील. शापाने क्रौंचाचे बलवान उंदरात परिवर्तन झाले. तो उंदीर पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ पडला.
ALSO READ: जेव्हा श्री गणेश वृद्ध महिलेच्या हुशारीने प्रसन्न झाले
या उंदराने पराशर ऋषींच्या आश्रमात खूप धुमाकूळ घातला. आश्रमातल्या अन्नधान्याची नासाडी करण्यास सुरुवात केली. आश्रमातील ग्रंथ-पोथ्या, कपडेसुद्धा त्याने कुरतुडून टाकले. त्याने आश्रमवासी आणि पराशरऋषींना भंडावून सोडले. शेवटी पराशरऋषींनी श्रीगजाननाची प्रार्थना केली, ‘ हे गजानन! आम्हाला या उंदराच्या त्रासापासून सोडव.’
 
मग गणपतीने तेथे प्रकट होऊन आपला पाश उंदरावर टाकला. पाताळात उंदीराचा पिच्छा करत पाशने त्याचा कंठ बांधला गेला आणि गणपतीसमोर प्रस्तुत झाला. तेव्हा तो उंदीर आपली सुटका करावी म्हणून गणपतीकडे गयावया करु लागला. उंदीर शरण आला म्हणून गणपतीने त्याला वर मागण्यास सांगितले.
ALSO READ: Ganesh Chaturthi 2025 : गणपती आणि मूठभर तांदळाची खीर
पण उंदराचा उन्मत्त्पणा अजूनही गेला नव्हता. त्याने गर्विष्ठपणे गणपतीलाच म्हटले, ‘मला तुझ्याकडून कोणताही वर नको हवं असल्यास तूच माझ्याकडे वर माग.’ त्याचा हा उद्धामपणा पाहून गणपती हास्यस्मित करत लगेच म्हणाले, ‘जर तूझं वचन सत्य आहे तर आजपासून तू माझे वाहन हो.’ मूषकने तथास्तु म्हटले आणि गणपती लगेच उंदराच्या पाठीवर आसनस्थ झाले. मग मात्र गणपतीच्या भाराने तो उंदराच्या प्राणावर संकट ओढावले तेव्हा उंदराने प्रार्थना केली की मला तुझा भार सहन करणे योग्य करं. आणि त्या दिवसापासून उंदीर गणपतीचे वाहन झाला. 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Saphala Ekadashi 2025 सफला एकादशी कधी? शुभ -मुहूर्त, नियम आणि महत्व जाणून घ्या

आरती मंगळवारची

मंगळवारी जेवणात हा पदार्थ नक्की बनवा, जीवनात सकारात्मकता येईल

मंगळवारी उपवास करताना टाळाव्यात अशा ५ चुका

Neem Karoli Baba कैंची धाम येथे 'फॅमिली मॅन' अभिनेता मनोज बाजपेयी यांचे आयुष्य बदलले, बाबांच्या चमत्कारांनी थक्क झाले

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments