धूम्रकेतु - द्बिभूज अथवा चतुर्भूज व धूम्रवर्णी अवतार. वाहन निळा घोडा.
श्वेता - पांढर्या रंगासारखा पवित्र असल्यामुळे याचे नाव श्वेता पडले.
रुद्रप्रिया - भगवान शिवचे प्रिय असल्यामुळे त्याचे नाव रुद्रप्रिया पडले.
विकट - विकट नावाचा प्रसिद्ध अवतार कामासुराचा संहारक आहे. मयूर त्याचे वाहन आहे.
महोदर - महोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर (पोट) असणारा. याचे मूषकवाहन आहे .
गजानन - गजानन अवतार सांख्यब्रह्म धारक आहे. त्याला लोभासुर आणि मूषक वाहन असेही म्हटले आहे.
गणपतीला काही ठिकाणी
गृत्सम द असेही म्हटले आहे. 'मदस्राव करणारा हत्ती' असा या शब्दाचा अर्थ.
सकल बाधांचा एकच्छत्र अधिपती व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस
विघ्नाधिपती हे नाम प्राप्त झाले.
गणपतीच्या गळ्यात कपिलमुनींनी रत्न चढवले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे
चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.
गणेश शब्दाचा अर्थ गणांचा- ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपती म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे.
ॐकार - या एकाक्षर ब्रह्मात वरचा भाग गणेशाचे मस्तक, खालचा भाग उदर, अर्धचंद्र लाडू व मागची अर्धवर्तुळाकार रेघ म्हणजे सोंड असे म्हटले आहे.
एकदा एका विवाहाप्रसंगी पार्वती गप्पा करता करता हसली आणि तिच्या हास्यातून एक पर्वतासमान महान पुरूषाचा जन्म झाला त्याचे नाव
विघ्नरा ज झाले.
मयूरेश्व र - हा षडभूज व श्वेतवर्णी अवतार आहे. वाहन मोर. त्रेता युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंधू दैत्याच्या वध केला.