Festival Posters

वेदांत गणेश

- डॉ. मनस्वी श्रीविद्यालंकार

Webdunia

विघ्नहर्त्याचे महात्म्य स्पष्ट करणारे वैदिक वाड:मयातील काही महत्वपूर्ण मंत्र :

शुक्ल यजुर्वेदात खालील मंत्रांचा उल्लेख आहे-
' गणानां त्वा गणपति (गुं) हवामहे
प्रियानां त्वा प्रियपति (गुं) हवामहे
निधिनां त्वां निधिपति (गुं) हवामहे।'
 
यज्ञ, पूजा किवा कोणत्याही शुभकार्याच्या शुभारंभास ह्या मंत्राचे पठण केले जाते. ऋग्वेदातही हा मंत्र आढळतो-
' गणानां त्वा गणपति हवामवे कविं कवीनापुमश्रवस्तम्‌।
ज्येष्ठराजं बृह्मणां बृह्मणस्पत आ नः श्रण्वन्नतिभिः सीद सादनम्‌॥'

' गणपतये स्वाहा' पासून गणपतीस आहूती अर्पित करण्याचा मंत्र कृष्ण यजुर्वेदीय कण्वसंहितेशिवाय (२४/४२) कृष्ण यजुर्वेदीय मैत्रायणीसंहिते (३/१२/१३) मध्येही आढळत ो.

शुक्ल युजर्वेदातही (२२/३०) 'गणपतये स्वाहा' ने आहुति देण्याचा संदर्भ आहे. बृहत्पाराशर स्मृतित शुक्ल यजुर्वेदात (२३/१९) 'गणानां त्वा... हवामहे' या मंत्रासोबत स्वाहा वगळून हवन करण्यास सांगण्यात आले आहे. ऋग्वेदात (१०/११२/९) 'निषुसीद गणपतये.... मधवञ्चित्रमचां' ही ऋचा प्राप्त होते. यामध्ये सदकार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासंबंधी गणपीची प्रार्थना केली आहे. शुक्ल यजुर्वेदात (३३/६५-७२) 'आ तू न... ' आठ मंत्र गणपतीस अर्पित करण्यात आले आहेत. ऋग्वेदातही (८/८१/१) जवळपास सारखेच मंत्र सापडतात-

' आ तू न इन्द्र क्षुमन्तं ग्रामं सं गृभाय।'
कृष्ण यजुर्वेदीय मैत्रायिणी संहितेत गणेशाच्या खालील गायत्रीचा उल्लेख आह े.
' ॐ तत्कराटाय विघ्नहे हस्तिमुखाय धीमहि। तन्नो दन्ती प्रचोदयात्‌।'
अथर्ववेदाच्या शौनकी संहितेत वरिल मंत्र 'एक दन्ताय विघ्नहे वक्रतुण्डाय धीमहि। तन्नौ दन्ती प्रचोदयात।' अशा स्वरूपात आढळतो.

शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन संहितेत (१६/२५) आणखी एक मंत्र आढळत ो.
' नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमः'

कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तरीय-आरण्यकात गणेश गायत्री मंत्र खालील प्रकारे आढळतो-
तत्पुरुषाय विघ्नहे वक्रतुण्डाय धीमहि।
तन्नौ दन्ती प्रचोदयात।'

याव्यतिरिक्त अथर्ववेदाच्या गणेशपूर्वतापन्युपनिषदात (११५) खालील मंत्र आढळतो-
' गणानां त्वा गणनाथं सुरेन्द्र... सीदं शश्वत।'

अथर्ववेदाच्या गणेश उत्तरतापिनी उपनिषदात गणेश मंत्र भिन्न स्वरूपात आढळतो-
' गणानां त्वा गणपतिम्‌ । सप्रियाणां... प्रचोदयात।'

' बृहतजाबाल उपनिषद', 'गणपति उपनिषद', 'हेरम्ब उपनिषद' यासारख्या ग्रंथामध्ये श्री गणेशाचा उल्लेख आढळतो. अतिंमत: वेदांमध्ये श्री गणेशाचा उल्लेख आढळतो, असे निर्विवादपणे म्हणता येते.
सर्व पहा

नवीन

अपरा एकादशी व्रत कथा Apra Ekadashi 2026 Vrat katha

Apara Ekadashi Vrat 2026 अपरा एकादशी पूजा विधी तसेच महत्त्व जाणून घ्या

युगे अठ्ठावीस विठ्ठल आरती

आरती बुधवारची

श्री विष्णूची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

Show comments