Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जय जय गणराया

Webdunia
WD
श्री सच्चित् आनंदा जय जय गणराया।
नेईं परम पदातें तव भक्तां सदया।।ध्रु.।।
अपार महिमा तूझा न कळे कवणांसी।
धर्मविचारी थकले गम्य न परि त्यांसी।
तीर्थाटन जन करिती रामेश्वर काशी।
परि नच शांती लाभे चंचल चित्तासी।।1।।

जगत्स्वरूपा तुजला स्थापूं मी कोठें।
आवाहन करूं कैसें सन्मंडपिं थाटें।
तव महिमा आठविता तर्कोदधि आटे।
पाहुनि अद्भुत शक्ती आदर बहु वाटे।।2।।

गंधाक्षतसुमदूर्वा तय योग्य न मिळती।
तव निज महिमा सूचक मंत्र न मज येती।
अर्ध्यस्त्रानविलेपन करुं केंवी रीति।
नकळे, येउनि राहो हृन्मंदिरिं मूर्ति।।3।।

काया वाचा मनही तव सेवे लागो।
जो तूं सत्पथ दाविसि त्या मार्गें वागो।
तव गुणचिंतनिं मन्मन आनंदें जागो।
' सज्जन संगति देई' वर निशिदिनिं मागो।।4।।
सर्व पहा

नवीन

भारतातील पाच प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर

आरती शुक्रवारची

खिसा नेहमीच रिकामा असतो ? पैसा टिकत नसेल तर फक्त शुक्रवारीच काम करा

सिद्ध मंगल स्तोत्र मराठी

आरती गुरुवारची

सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

Show comments