Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री मोदकेश्वर गणपती

शिल्पा बेदरे

Webdunia
PRPR

मोरया मोरया मी बाळ तान्हे

तुझी सेवा करू काय जाणे ।

अन्याय माझे कोट्यानुकोटी

मोरेश्वराबा तू घाल पोटी ॥

असा हा आपल्या लेकरांचे अपराध पोटात घालणारा लंबोदर. संपूर्ण भारतीय संस्कृतीतली प्रथम आराध्य देवता म्हणून पुजला जातो. वक्रतुंड, एकदंत, लंबोदर, धुम्रवर्ण, भालचंद्र, कृष्णपिंगाक्ष, मोदकेश्वर, सिध्दीविनायक अशी त्याच्या रूपावरून वेगवेगळी नावे प्रचलित आहेत.
भारतातील २१ वरदविनायकांपैकी एक स्वयंभू गणेश मंदिर नाशिकच्या गंगाघाटावर आहे. मोदकेश्वर मंदिर या नावाने हा गणपती प्रसिद्ध आहे. गेल्या ८ पिढ्यांपासून क्षेमकल्याणी कुटुंबीय मंदिराची व्यवस्था पाहत आहेत.
एकदा देवांनी विशेष श्रध्देने आणि परिश्रमाने महाबुध्दी आणि अमृताने भरलेला मोदक भगवान शंकरांकडे दिला. आपल्या मुलांसाठी तो मोदक शंकर कैलास पर्वतावर घेऊन आले परंतु तो खाण्यासाठी स्कंद आणि गणेश यांच्यात भांडण झाले.त यावर उपाय म्हणून दोघा भावंडांना 'पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य ज्याच्याकडे असेल त्याला मोदक दिला जाईल' असे सांग्यात आले. यावेळी आपल्या अक्कलहुशारीने गणेशाने आपल्या माता-पित्याची पूजा करून तीन प्रदक्षिणेचे पुण्य मिळवून मोदकावर आपला हक्क सांगितला.

हाच मोदकेश्वर आपल्या हातातला मोदक खात खात आकाश मार्गाने भ्रमण करत असताना नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठाने जात असताना त्याच्या हातातील मोदक खाली पडला. आपली अतिशय आवडीची वस्तू हातातून खाली पडल्यामुळे मोदकेश्वर खाली उतरला, याची आठवण रहावी म्हणून गणेशाने स्वयंभू गणेशमूर्तीच्या स्वरुपात तेथे वास्तव्य केले.

श्री मोदकेश्वर गणपती मंदिर गोदावरी नदीच्या तीरावर पूर्वाभिमुख असलेले स्वयंभू, जागृत आणि अति पुरातन मंदिर आहे. श्री मोदकेश्वर गणरायाच्या मंदिराचा मूळ गाभारा चार खांबांचा आहे. त्यात शेंदूर विलेपित मूर्ती अतिशय प्रमाणबध्द, आकर्षक रूपात स्थित आहे. प्रातःकालची कोवळी किरणे नेमकी श्री मोदकेश्वराच्या चरणावर पडतात. त्यावेळची शोभा अवर्णनीय अशीच आहे.

क्षेमकल्याणी कुटुंबियांच्या पूर्वजांनी या मोदकेश्वराची मूर्ती प्रकट झाली, त्यावेळी मंदिराची उभारणी केली. तेव्हापासून ते आजपर्यंत पिढीपर्यंत श्री मोदकेश्वराची सेवा पुजाधिकार व व्यवस्थापनाची जबाबदारी सलग आजची आठवी पिढी पार पाडत आहे. पुजारी पंकज क्षेमकल्याणी सध्या पुजा विधी व व्यवस्थापन बघत आहे. श्री मोदकेश्वर मंदिराच्या पवित्र जागेवर पूर्वी जमिनीत पाषाणाचे मोदक सापडत असत. तसेच या गणेशाच्या उदरात हिरे, माणिक असल्याची भाविकांची श्रध्दा आहे.

मंदिरात दररोज सकाळी महापूजा आरती केली जाते. गणेश जयंती, गणेशोत्सव या दिवसात ‘श्रीं’च्या मूर्तीला चांदीचे दागिने, डोळे, मुकुट, हार, मूर्तीवर चढवल्या जातात. अतिशय आकर्षक अशी ही मूर्ती यावेळी भाविकांची नजर खिळवून ठेवते. मंदिराभोवतीची विद्युत रोषणाई व मूर्तीची आकर्षक सजावट बघण्यासाठी गणेश भक्तांची मोठी रांग लागलेली असते. त्याचबरोबर पर्जन्यवृष्टीसाठी करण्यात येणारे गणेश याग, सहस्त्रावर्तने, या कार्यक्रमातही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

अतिशय पुरातन अशा या मंदिरात श्री मोदकेश्वर गणपतीच्या मागील बाजूस रिध्दी व सिध्दी या दोन देवींच्या मूर्ती आहेत. तसेच मंदिराला लागूनच एक काशी विश्वेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्यामुळे पिता-पुत्र एवढे निकट सान्निध्य इतर मंदिरात सहसा आढळत नाही. तसेच बाहेरील प्रशस्त गणेश मठात श्री सत्यनारायण, राम, तसेच विठ्ठल मूर्ती आहेत. मंदिराचा मठ व त्यावर तीन मजली बांधकाम आहे. हे अतिशय पुरातन व रेखीव असल्या कारणाने त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता पुजार्‍यांनी त्यात सुधारणा केल्या आहेत.
सर्व पहा

नवीन

श्री शनिदेव आरती Shri Shani Aarti

Shani Trayodashi 2024 आज शनि त्रयोदशीला पिंपळाच्या झाडाजवळ या प्रकारे लावा दिवा

शनि त्रयोदशीच्या दिवशी शनिदेवाला या गोष्टी अर्पण करा, साडेसाती आणि ढैयाच्या दुष्परिणामांपासून मुक्ती मिळेल

शनि त्रयोदशी व्रत कथा

आरती शुक्रवारची

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

Show comments