Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र

Webdunia
सोमवार, 12 मे 2014 (11:55 IST)
महाराष्ट्र विधानपरिषदेच 5 जागांची निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी संयुक्तपणे लढविणार आहे. विधानपरिषदेच 5 सदस्यांची मुदत 19 जुलै रोजी संपणार आहे. त्यामध्ये भाजपचे नितीन गडकरी यांचाही समावेश आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणूक काँग्रेस पक्ष लढविणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष औरंगाबाद आणि पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविणार आहे. ते पुढे म्हणाले, हा निणर्य  रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यच्याबरोबर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित होते.
गडकरी यांनी लोकसभेची निवडणूक लढविली आहे. याशिवा निवृत्त होणार्‍या सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, भाजपचे चंद्रकांत पाटील, अपक्ष सदस्य भगवानराव साळुंखे, वसंत खोटेरे यांचा समावेश आहे.

या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला.
सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

विरोधानंतरही मुंबईतील 221 पोलिसांच्या बदल्या

MVA मधील सीट वाटपावरून वाद कसा संपेल? शरद पवार यांनी सुचवला मार्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, अयोध्या दीपोत्सवाचाही उल्लेख केला

स्पेनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे 95 जणांचा मृत्यू, वादळ येणे बाकी

महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का, रवी राजा यांनी राजीनामा का दिला?

Show comments