Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राखी सावंतही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

Webdunia
गुरूवार, 27 मार्च 2014 (11:05 IST)
बॉलिवूडची आयटमगर्ल राखी सावंत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. राखी उत्तर पश्चिम मुंबईमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे.
 
या मतदारसंघातून मनसेतर्फे महेश मांजरेकर, आपकडून मयांक गांधी, काँग्रेसकडून गुरुदास कामत आणि शिवसेनेकडून गजानन किर्तीकर अशी चौरंगी लढत होत असतानाच, राखीने संकेत दिल्याने ही निवडणूक अजूनच रंगतदार होणार आहे.
 
मध्यंतरी राखी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंग यांना भेटायला थेट दिल्लीत गेली होती. मात्र तिची काही भेट होऊ शकली नाही. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राखीने भाजप कार्यकत्यांची भेट घेतल्याने ती भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशी चर्चा होती.

 
मात्र, राखीला कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार हे अजून स्पष्ट झाले नसून, याबद्दल राखी 29 मार्चला सागंणार आहे. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये चुरशीची लढत बघायला मिळणार आहे. 

(सर्व छायाचित्र : Ashish Vaishnav / Indus Images)

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments