Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला

Webdunia
बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (10:30 IST)
भाजपने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात जनतेला अनेक मोठी आश्वासने दिली गेली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करत गोव्याचे सक्षमीकरण, पर्यटनाला चालना देणे, गरिबी संपवणे अशी मोठी आश्वासने दिली.
 
भाजपच्या जाहीरनाम्यात पुढील 10 वर्षांत 50 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे आश्वासन.
 
गृहिणींवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी गोव्यातील प्रत्येक घराला वर्षभरात 3 मोफत एलपीजी सिलिंडर पुरवणार.
 
DDSSY (दीन दयाळ स्वास्थ्य सेवा योजना) अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन दरमहा 3,000 रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे.
 
गोवा मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सहा महिन्यांच्या आत खाण उपक्रम (2018 पासून निलंबित) पुनर्संचयित करण्याचे वचन दिले.
 
पुढील पाच वर्षांत पर्यटकांची संख्या दुप्पट करणे. अंतर्देशीय पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, वारसा आणि अध्यात्मिक पर्यटन तसेच साहसी खेळ आणि समुद्रकिनारी पर्यटनाभोवती विद्यमान पायाभूत सुविधा वाढवून देणे.
 
गोव्याला मीटिंग्ज, इन्सेन्टिव्ह, कॉन्फरन्स आणि एक्झिबिशन साठी आशियाई केंद्र बनवण्याचे वचन.
 
गोव्यातून मिशन गोल्ड कोस्ट सुरू करण्याचे आश्वासन.
 
किनारपट्टीच्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रित करण्यासाठी सरकार करांवर कमाल मर्यादा निश्चित करेल.
 
पुढील पाच वर्षांत पात्र कुटुंबांना महिलांसाठी दोन टक्के आणि पुरुषांसाठी चार टक्के व्याजदराने गृहकर्ज दिले जाईल.
 
प्रत्येक पंचायतीसाठी रु. 3 कोटी आणि प्रत्येक नगरपालिकेसाठी रु. 5 कोटींपर्यंतचा सर्वसाधारण विकास निधी असणारा मनोहर पर्रीकर कल्याण निधी सुरू करण्याचे आश्वासन.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

एमआयडीसी फॉइल कारखान्यातील स्फोटात मृत्युमुखी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने भरपाई आणि नोकरी जाहीर केली

मुंबईत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

LIVE: जळगाव जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

यवतमाळ जिल्ह्यात एका झाडाने शेतकऱ्याला करोडपती केले

एलएसजीने गुजरात टायटन्सचा 6 गडीने पराभव केला,टॉप-4 मध्ये स्थान मिळवले

पुढील लेख
Show comments