Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"कुळदैवत" महत्तव, कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे

Webdunia
सोमवार, 11 मे 2020 (11:42 IST)
प्रत्येक घराण्याचे आराध्य दैवत असतात. त्यांना आपण त्या कुळाचे दैव म्हणतो. आपल्या घरात काही ही शुभ कार्ये लग्न, मुंज, वास्तू पूजन केल्यावर आपल्या आराध्याचे दर्शनास जाणे महत्वाचे असतं. आता प्रश्न असा की कुळदैवत किंवा कुळदेवी म्हणजे असतं तरी काय ? आपले कुळदैवत कुठले आहे काय असतं त्याचे महत्व ? कुळाचार म्हणजे काय ? कुळदैवत संबंधी आपले कर्तव्य काय आहे ? 
 
खरं तर हे सर्व प्रश्न प्रश्नच राहतात ह्याचे कारण असे की सध्याच्या काळात विभक्त कुटुंब असल्यामुळे या सर्व प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ज्येष्ठ मंडळी कोणीच नसतात. 
 
घरात एखादी समस्या उदभवली की सगळ्यांची धांधळच उडते. आपली अध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या त्या देवतेची उपासना करणे आवश्यक असतं. अशा कुळातच देव आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची दैवत असे म्हणतात. त्या कुळदैवतेची उपासना कशी करावी. त्या विषयी माहिती मिळाल्यास आणि तसे केल्यास माणसाची प्रगती जलद होते. 
 
कुळदैवत शब्दाचा अर्थ :- 
कुळ देवता शब्द कुळ आणि देवता या दोन शब्दांनी बनलेला आहे. कुळाची देवता ती कुळदेवता. ज्याची उपासना केल्यावर आपली आध्यात्मिक उन्नती होण्यास शुभारंभ होतो. ती म्हणजे कुळदैवत. कुळदेव पुरुष असल्यास कुळदेव आणि स्त्री दैवत असल्यास कुळदेवी म्हणतात. 
 
कुळदेवतेची उपासनेचे महत्व : 
या ब्रह्माण्डात व्याप्त असलेली सर्व तत्व पिंडात आली की साधना पूर्ण होते. श्री विष्णू, शंकर आणि गणपतीची उपासना केल्यास ही तत्व वाढ होतेच पण या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे बळ कुळदेवतेच्या नामस्मरणामध्ये त्यांचा जपामध्ये असतं. त्यांचे नामस्मरण केल्याने त्यांची उपासना केल्याने उपासकाला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. कुळदेव आणि कुळदेवी दोन्ही असल्यास दोघांचे नामस्मरण किंवा जप चालू ठेवावे. 
 
कुळदैवत ठाऊक नसल्यास काय करावे : 
कधी कधी असे ही होते की आपल्याला आपले कुळदैवतच ठाऊक नसते की कोणते आहे. अशात असे करावे-
मूळ स्वरूप असलेले देवते - ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया विष्णूंची. 
अवतार स्वरूपातील देवते - नृसिंह, राम, कृष्ण, परशुराम 
शंकराची अवतार रूपाची देवते - काळभैरव, खंडोबा, मारुती आदिमायेची.
अवतार रूपाची देवते - सरस्वती, लक्ष्मी पार्वती, दुर्गा,चंडी, काळी.
शंकर हे गणांचे मुख्य अधिपती तसेच गणपती हे पूजनेच्या आरंभातील दैवत.
देवांचे सेनापती - कार्तिकेय.
वैदिक देवते - इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य, उषा (सूर्य आणि अग्निचीच उपासने आजतायगत प्रचलित आहे).
 
आपले कुळ दैवत किंवा कुळदेवी माहिती नसल्यास वरील पैकी ज्या देवावर आपली भक्ती आहे त्यांची उपासना करावी. 
 
या व्यतिरिक्त ग्राम दैवत सुद्धा असते. ग्राम दैवत म्हणजे त्या संपूर्ण गावाचे दैवत. कुळदेव म्हणजे कुळाचे रक्षण करणारे आणि इष्टदैव म्हणजे आपल्याला आवडणारे. तसेच ग्रामदैवत म्हणजे संपूर्ण गावाचे रक्षण करणारे. 
 
एखाद्याचे कुळदैवत कोणते हे कसे ठरवावे- 
कुळ म्हणजे कोणी एका मूळ पुरुषाने पुढे निर्माण केलेले आणि एकमेकांशी रक्ताच्या नात्याने बांधलेले विभक्त कुटुंब. आधीच्या काळात बहुधा एखाद्या कुटुंबाचा एखाद्या गावाशी संबंध असावा. जिथे वस्ती केली तिथे एक देऊळ बांधले. कुळ म्हणजे कुटुंब वाढला की असे म्हटत असावेत. जरी हे लोकं स्थळान्तरित झाले तरी देव तेच असावेत. अशी समज आहे. 
 
एकाच कुळातील लोकं एकच आडनाव लावतील असे नाही. परंतु कुळ दैवत, गाव, जात वरुण ते एकाच कुळातील असतात. आप्त संबंधामुळे जे एकत्र येतात असे एका रक्ताचे संबंधाचे लोकं त्याचा समूहास कुळ म्हणतात. कुळ शब्दाला घराणं असे ही म्हंटले जाते. 
 
कुळदेव किंवा कुळ देवी हे आपल्या काळाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असे. ह्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमीच राहो तसेच आपली उन्नती होण्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुळदेवी कुळदेवाच्या दर्शनास अवश्य जाऊन यावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

कालभैरवाष्टकम् Kalabhairava Ashtakam

Kotwal of Kashi काल भैरवाला काशीचा कोतवाल का म्हणतात?

Kaal Bhairav Ashtami 2024 भगवान कालभैरवाला प्रसन्न करण्याचे उपाय

आरती शुक्रवारची

Utpanna Ekadashi 2024: उत्पन्ना एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments