Dharma Sangrah

वसंतशोभा

Webdunia
ND
चैत्र हा वसंताच्या आगमनाचा महिना आहे. आसमंत हळूहळू गरम उष्णतेने भरू लागतानाच चैत्रपालवी झाडावर झळाळू लागते. गीतरामायणात रामाच्या जन्माच्या वर्णनाच्या वेळी (कारण रामनवमी चैत्रातच असते ना!) ग.दि.मा. म्हणतात, '' गंधयुक्त तरिही उष्ण वात ते किती...'' गरम असली तरी हवा गंधयुक्त म्हणजेच सुगंधित असते कारण सर्वात सुवासिक असा मोगरा याच काळात फुलतो, बहरतो.

गरमीच्या झळा जाणवत असताना आगीच्या ज्वालांप्रमाणे भासणारा पांगारा, पूर्ण फुलांनी डवरलेला निष्पर्ण (रस्त्यावर लाल रंगाचा गालिचा पसरवणारा) गुलमोहर पळस यासारखे मोठे वृक्षही आपले थोराडपण विसरून नव्या नव्हाळीने सजतात.

ND
फळांचा राजा तर याच काळात मोहरतो, फळतो अन् आपल्या रसाळ गोमट्या फळांनी लहान थोरांची, गरीब-श्रीमंताची रसना तृप्त करायला तयार होत असतो. सगळीकडे उत्तमोत्तम गोष्टींची पखरण करणारा हा वसंत म्हणजे एखाद्या राजाच आहे (ऋतूंचा राजाच म्हणाना !) राजाच तो, त्याला कशाची कमतरता, सगळ अगदी व्यवस्थित, साग्रसंगीत व आपल्या उच्च अभिरुचीनुसार तो घडवतो जसे मोगर्‍याचा सुगंध, आंब्याची डाळ, पन्हे, वाळ्याचे पडदे हा सारा थाट, ही व्यवस्था त्याच्या आगमनाचीच. असतात. मंगळागौर, डोहाळजेवण, हळदीकुंकू यासारखे (बायकी!) सण म्हणजे त्यांच्यातील सृजनाला आवतण. गौर सजवणे, वेगवेगळ्या रांगोळ्या, कला कुसरीच्या वस्तू, पाकक्रियेतली निपुणता हयात त्या हळूहळू पारंगत होत असाव्यात.

हल्ली या प्रकारचे समारंभ आपल्याला वेळानुसार, सवडीनुसार का होईना पण होतातच आणि त्यातून सर्वजण आनंदही मिळवतात कारण आजच्या धकाधकीच्या आयुष्यातही प्रत्येकीला मोकळे होण्यासाठी अशी संधी मिळणे गरजेचेच आहे.

ND
याच महिन्यात 'बालचंद्रमा व्रत' करतात म्हणजे सूर्यास्ताला अंघोळ करून आकाशातल्या चंद्राची किंवा तांदळा पासून चंद्र तयार करून त्याची पूजा करायची. (बालचंद्रमसे नम:) प्रत्येक महिन्याच्या चंद्रदर्शना दिवशी ह्या प्रमाणे करावे वर्षभर हे व्रत करतात व ह्या दिवशी तळलेले पदार्थ खात नाहीत.

Shani Jayanti 2026 : नशीब उजळण्यासाठी शनी जयंती आणि वट सावित्री अमावस्येच्या दिवशी हे सोपे उपाय करा

Shani Jayanti 2026 शनैश्चर जयंतीला या पदार्थांचे सेवन मुळीच करू नये

Mahalakshmi Mantra देवी लक्ष्मीचे ६ चमत्कारी मंत्र: संपत्ती, समृद्धी आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी अचूक उपाय

आरती शुक्रवारची

सावधान! विवाहित पुरुषांनी 'या' ७ गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नयेत, अन्यथा तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल!

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

Show comments