Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Gujarat Election: ''नो ट्रेन, नो व्होट', 18 गावांतील लोकांनी भाजप-काँग्रेस प्रवेश करण्यावर बंदी घातली

Webdunia
सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (23:12 IST)
गुजरात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. तारखा जाहीर झाल्या असून सर्व पक्षांनीही तयारी केली आहे. मात्र, नवसारी विधानसभेतील 18 गावांतील जनतेने सर्वच पक्षांची चिंता वाढवली आहे. या ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर भाजपसह अन्य पक्षांच्या नेत्यांना येण्यावर आणि गावात प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, येथील अंचेली रेल्वे स्थानकावर लोकल गाड्यांना थांबा देण्याची ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून मागणी होती, मात्र त्यांची मागणी मान्य करण्यात आली नसल्याने ते संतप्त झाले आहेत. अंचेली रेल्वे स्थानक व इतर स्थानकांवर ग्रामस्थांच्या वतीने बॅनरही लावण्यात आले आहेत. त्यांच्यावर 'नो ट्रेन, नो व्होट' असे लिहिले आहे.
 
गाड्या न मिळाल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत   आहे. एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किमान 300 रुपये खर्च करावे लागतात. गावात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अभ्यासात अडचणी येत असल्याचे ते सांगतात. अनेकदा त्यांना कॉलेजला जायला उशीर होतो, त्यामुळे लेक्चरही चुकतात. 
1966 पासून अंचेली रेल्वे स्थानकावर गाड्या थांबत आहेत. पूर्वी पॅसेंजर ट्रेन येथे थांबत असत, नंतर त्यांची संख्या वाढली. मात्र, कोरोना महामारीच्या काळात या स्थानकावर गाड्या थांबण्या बंद झाल्या. आता सर्वकाही पूर्वपदावर आले आहे, तरीही येथे गाड्या थांबत नाहीत. याठिकाणी गाडी थांबली नाही, तर मतदानाच्या दिवशी एकही व्यक्ती मतदानासाठी जाणार नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

Gas Cylinder:रेशनकार्ड धारकांना सरकार देत आहे 450 रुपयांना एलपीजी गॅस सिलिंडर

बटाट्यावरून वाद, वृद्ध महिलेवर हल्ला, नागपूरची घटना

दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव फायनल, सस्पेन्स आज संपणार?

जाधववाडी येथे ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार

पुढील लेख
Show comments