कृत ी- पाव किलो पालक धुवून बारीक चिरून घ्यावा. मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरावेत. नेहमीप्रमाणे फोडणी करावी. नंतर त्यात बारीच चिरलेला कांदा टाकावा. एक वाफ घ्यावी. मग चिरलेला पालक त्यात घालावा व परतावा. एक वाफ आल्यावर दाण्याचा कूट त्यात घालावा. तिखट-मीठ चवीनुसार वापरावे. हिरव्या मिरचीचे तुकडे घातल्यास तिखट घालू नये.