Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आवळा नवमी कथा ऐका, वर्षभर देवी लक्ष्मीची कृपा मिळवा

Webdunia
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2023 (11:29 IST)
Amla Navami Katha 2023 हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला अक्षय नवमी किंवा आवळा नवमी म्हणतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. तसेच प्रभु विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
 
आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याचे झाड लावणे शुभ मानले जाते. दररोज त्याची सेवा केली पाहिजे. असे शक्य नसल्यास किमान आवळ्याची पूजा केली पाहिजे.
 
या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करावे. याने जीवनात सुख-शांती आणि समृद्धी येते. असे केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. 
 
आवळा नवमी कथा
आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वत: देवी लक्ष्मी यांनी सुरू केली होती. या संदर्भात एक कथा आहे की जेव्हा देवी लक्ष्मी पृथ्वी भ्रमणासाठी आली तेव्हा रस्त्यात त्यांना प्रभू विष्णू आणि शिव या दोघांची सोबत पूजा करण्याची इच्छा जागृत झाली. परंतू देवी लक्ष्मी यांनी विचार केला की विष्णू आणि शिव यांची सोबत पूजा कशा प्रकारे शक्य आहे. तेव्हा देवी लक्ष्मीच्या ध्यानात आले की तुळस आणि बेल यांचे गुण आवळ्याच्या झाडात आढळतात. तुळस विष्णूंना प्रिय आहे तर बेल पत्र महादेवाला.
 
तेव्हा आवळ्याच्या झाडाला प्रभू विष्णू आणि शिव यांचे प्रतीक मानून देवी लक्ष्मी यांनी आवळ्याच्या झाडाची पूजा केली. पूजेमुळे प्रसन्न होऊन प्रभू विष्णू आणि शिव प्रकट झाले. तेव्हा देवी लक्ष्मीने भोजन तयार करून आवळ्याच्या झाडाखाली दोन्ही देवांना जेवू घातले. नंतर स्वत: भोजन ग्रहण केले. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी कार्तिक शुक्ल नवमी तिथी होती. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे.
 
एका आणखी कथेनुसार एका युगात एका वैश्यच्या पत्नीला पुत्र रत्न प्राप्ती होत नव्हती. तेव्हा तिने आपल्या शेजारणीचे ऐकून भैरव देवाला एका मुलाची बळी दिली. याचे उलट फळ भोगावे लागले आणि महिला कुष्ठ रोगाने ग्रसित झाली. यावर ती पश्चात्ताप करू लागली आणि रोगमुक्त होण्यासाठी गंगेच्या शरणी गेली.
तेव्हा गंगेने तिला कार्तिक शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून आवळा सेवन करण्याचा सल्ला दिला. गंगेच्या सांगितल्याप्रमाणे तिने पूजन करून आवळा ग्रहण केला आणि रोगमुक्त झाली.
 
या प्रभावाने तिला दिव्य शरीर आणि पुत्र रत्नाची प्राप्ती झाली. तेव्हापासून हिंदू लोकांमध्ये हे व्रत करण्याची परंपरा पडली.

संबंधित माहिती

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

Maa lakshmi : देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला या 5 वस्तू अर्पण करा

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

Paris Olympics 2024: कुस्ती संघटना 21 मे रोजी चाचण्यांबाबत निर्णय घेऊ शकते

PM Modi In Mumbai : स्वप्नांच्या शहरात मी 2047 चे स्वप्न घेऊन आलो आहे- पंतप्रधान मोदी

एलोर्डा चषक बॉक्सिंगमध्ये अंतिम फेरीत निखत जरीनसह चार बॉक्सर्स

पुढील लेख
Show comments