Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाभारतात अधर्माला जन्म देणाऱ्या चुका

Webdunia
महान भारताची गाथा आणि धर्माची स्थापना करणारा प्राचीन भारतीय महाकाव्य 'महाभारत' ज्यात लोकांना धर्म-अधर्माची माहिती दिली आहे आणि कर्माबद्दल ज्ञान दिलं आहे, त्या महाभारतात देखील अधर्म झाले होते ? त्याला अधर्म म्हणायचे की मनुष्याला भविष्यासाठी तयार करण्याच्या हेतूने बरं-वाईट काय याची माहिती दिली गेली?
 
मोह, राग-द्वेष, सत्ता, अंधपणे, लोभ, प्रतिशोध असे इतर 'विकार' लोकांमध्ये होते ज्यामुळे महाभारतात अधर्म म्हणून अशा काही चुका झाल्या किंवा धर्म स्थापित करण्यासाठी हे केले गेले? कोणी केलेले पाप किंवा त्रास फक्त चुकीचे नसते पण त्याचे साक्ष होणे देखील चुकीचे आहे.
 
धृतराष्ट्राचा पुत्र मोह:- 
मोह, मनुष्य भावानांमधील सगळ्यात हावी असणारा भाव. एका चांगल्या उद्दिष्ट्यासाठी असलेला मोह व्यक्तीला पुढे वाढण्यात मदत करु शकतो पण हेच मोह एखाद्याचा पूर्ण नाश करण्यात पुरेसं ठरु शकतं. महाभारतात धृतराष्ट्राचा दुर्योधनसाठी असलेल्या पुत्र मोहामुळे किती अधर्म आणि वाईट घटनांना जन्म दिला हे तर सगळ्यांना माहित असेल. डोळ्यांची दृष्टी नसल्यामुळे अंधकारमध्ये त्यांना आयुष्य काढावा लागलं पण काय मेंदूच्या बुद्धीसमोर देखील अंधकार झाला होता? त्यांनी दुर्योधनाद्वारे पांडवांना द्यूत क्रीडाचे निमंत्रण हे प्रकरण का थांबवले नाही ? भरलेल्या सभेत एका स्त्रीचा सन्मान, मर्यादा भंग करत असणार्‍या दुशासनला का थांबवता आले नाही ?
 
शकुनीचा प्रतिशोध:- 
प्रतिशोध, अर्थात बदला घेण्याची भावना जवळ-जवळ सगळ्यांमध्ये असते पण जर ती तुमच्या कर्माला प्रभावित करणे सुरु करते आणि तुम्ही धर्म विसरून जातात तेव्हा विनाश सुरु होतो. शकुनी त्या मोठा कारणांपैकी एक होते ज्यांकारणे पूर्ण महाभारत घडली. आपले वडील आणि सगळ्या भावांना त्यांनी तरफडून मृत्यू होत असताना बघितलं आणि ह्याचा कारणाने भीष्म पितामह आणि संपूर्ण कुरु कुळाशी प्रतिशोध घेण्याच्या क्रोधात सर्व काही मातीत मिळाले.
 
युधिष्ठिरचे निर्णय:- 
आपण आज जे काय निर्णय घेतो त्याचा प्रभाव आपल्या भविष्यावर नक्कीच पडतो. 'धर्मराज युधिष्ठिर' ज्यांच्या नावात 'धर्मराज' जुळलेलं होतं त्यांनी धर्म पाळला का ? काय एक मनुष्याला दुसर्‍या मनुष्याच्या जीवनाबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे ? त्यांनी कोणावर डाव लावायचा याचा अधिकार त्यांना होता का ? एकदा द्यूत मध्ये हरल्यानंतर परत दुसऱ्यांदा कशाला ते द्यूत खेळायला गेले? आणि सगळ्यात महत्वाचे प्रश्न, किती ही अवघड परिस्तिथी असो काय आपल्या बायकोला, तिच्या मान-सन्मानाला डावावर लावणे धर्म होते का ?
 
कर्णाची मैत्री:- 
सामर्थ्यवान असणे आणि लायकी असणे हे दोन्ही एकच आहे ? एक व्यक्ती सामर्थ्यवान होऊ शकतो पण त्या सामर्थ्याचा कशा बुद्धीने वापर केला जात आहे यावरुन लायकी समजते. अंगराज कर्ण बलिष्ठ, सामर्थ्यावर योद्धा होते. राजपुत्र नसले तरी ते त्यांच्यासारखंच कौशल्य असणारे पण दिली साथ कोणाची तर अधर्माची. दुर्योधनासोबत मैत्री निभावणे आणि त्यांच्या संगतीने त्यांना देखील अधर्मी बनवलं? जरी तुम्ही तुमच्या कौशल्यात चांगले असाल पण वाईट बाजूचे समर्थन करत असाल तर तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकतं नाही.
 
भीष्म पितामह:- 
पाप किंवा अधर्म करते ती व्यक्ती शिक्षा यासाठी पात्र आहे पण त्याचे साक्षी होणे, आणि डोळ्यासमोर असे घडू देणे हे देखील अधर्म आहे. एका स्त्रीला तिच्या परवानगी विरुद्ध स्वंवरातून उचलून आणणे धर्म होतं का ? त्यांनी आंबासोबत हे काय केलं होतं? पितामह यांचे अनेक निर्णय असे होते ज्यांनी अनेक मोठ्या घडामोडींना जन्म दिला.
 
हे तर फक्त काही लोकांचे नाव आहे. तर काय ह्या लोकांनी धर्मची स्थापना होऊन देण्याआधी पहिले अधर्म केले होते? ह्याची नोंदणी ह्या महाकाव्यात आहे.
 
धर्म आणि कर्म, एका व्यक्तीला ह्याने काय कळतं? अनेक लोकांची धर्म आणि कर्म ह्यांच्याबद्दल वेग-वेगळी समझ आणि मान्यता असते. आपले केलेले कार्य आपले कर्म असतात आणि स्वाभाविक आहे आपण जे काही करतात त्याचा परिणामस्वरूपच फळ आपल्याला निकट भविष्यात मिळतं आणि आपला पुढील मार्ग आपले कर्मच ठरवतात. कर्म करताना बरं-वाईटची माहिती, कर्तव्य, नैतिकता आणि आचरण ह्यांचे पालन करणे हेच धर्म असतं.
 
'कर्म करा फळाची काळजी करु नका' हे तर आपल्याला शिकवलं आहे पण ते कर्म करण्यापूर्वी एकदा तरी विचार करतो का आपण? जर कोणताही कर्म करण्यापूर्वी आपण त्याच्याबद्दल विचार केला तर त्याच्या परिणामाची काळजी घेण्याची गरज भासणार नाही, आणि काय बरं काय वाईट याची जाणीव देखील होईल.

- हर्षिता बारगल

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

काल भैरव आरती Kaal Bhairav Aarti

कालभैरवाने काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का निवडले?

आरती शनिवारची

Kartik Amavasya 2024 कार्तिक अमावस्या कधी ? तारीख आणि पूजा विधी जाणून घ्या

कालभैरवाष्टकम् Kalabhairava Ashtakam

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments