Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Chaitra Gauri 2023 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

Webdunia
शुक्रवार, 24 मार्च 2023 (09:24 IST)
मराठमोळ्या स्त्रियां चैत्र महिन्यात हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीये पासून चैत्रगौर बसवतात. देवीला झोपाळ्यात बसवून संपूर्ण महिनाभर म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीया (अक्षय तृतीया) पर्यंत गौरीची स्थापना करून पूजा करतात. चैत्र महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे. तर या दरम्यान गौरीचे स्वागत कसे करावे आणि कसा साजरा करावा हा सोहळा हे जाणून घ्या
 
गौर म्हणजे देवी पार्वतीची पूजा केली जाते. स्त्रिया आपापल्याघरी हा सोहळा साजरा करतात. एका छोट्याश्या पाळण्यात गौर (अन्नपूर्णा) स्थापित करतात. 
 
महिन्याभरातील कुठल्याही एका दिवशी सुवासिनींना जेवायला बोलवतात. संध्याकाळी हळदी-कुंकूवाचा थाट करतात. या दिवशी गौरीच्या ओवती-भोवती साज सज्जा करतात.
 
कोकणात तर घरी आलेल्या सुवासीनी आणि कुमारिकेचे पाय धुवून त्यांचा हातावर चंदनाचे लेप लावतात. त्यांची भिजवलेले हरभरे आणि फळांनी त्यांची ओटी भरतात. कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ खायला देतात. "गौरीचे माहेर" गाणे गातात. ही पद्धत फक्त कोकणातच दिसते. 
 
महाराष्ट्रात तर गौरीचे हळदी-कुंकू करताना गौरी पुढे सुंदर अशी आरास मांडली जाते. या महिन्यात गौर आपल्या माहेरी येते अशी आख्यायिका आहे. 
 
कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ, बत्तासे, कलिंगड, काकडी, कैरीचे पन्हे, भिजवलेले हरभरे असा नैवेद्य देवीस अर्पण केला जातो. घराच्या अंगणात चैत्रांगण काढले जाते. 
 
चैत्र महिन्यात साजरा केला जाणारा हा एक धार्मिक पारंपरिक सोहळा आहे. या महिन्यात स्त्रिया आपापल्या घरी समारंभ साजरा करतात. एका पाळण्यामध्ये गौरीची स्थापना केली जाते. आपल्या सोयीप्रमाणे महिन्यातील एक दिवशी सवाष्ण जेवू घालण्याची प्रथा आहे तसंच व महिनाभरातल्या कोणत्याही एका दिवशी इतर स्त्रियांना हळदी-कुंकवाला बोलावतात. हळदी-कुंकवासाठी आलेल्या स्त्रिया व कुमारिका यांचे पाय धुवून त्यांच्या हातावर चंदनाचा लेप लावतात. भिजविलेले हरभरे आणि फळे यांनी त्यांची ओटी भरतात. तसेच कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरबर्‍याची डाळ आणि करंजी देतात. या सोहळ्यात चैत्रगौरीपुढे शोभिवंत आरास मांडण्याची पद्धतही आहे. या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे.
 
महिनाभर घराच्या अंगणात चैत्रांगण काढले जाते. देवीची शस्त्रे म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म आणि तिची वाहने म्हणजे गाय, हत्ती, कासव, नाग, गरूड होत. तिची सौभाग्याची लेणी म्हणजे फणी, करंडा, आरसा, मंगळसूत्र व सुवासिनींच्या ओटीचे ताट असून दारापुढे तुळशी वृंदावन, ॐ, स्वस्तिक, आंबा, श्रीफळ, उंबर- पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतीके म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चैत्रांगण होय. चैत्रांगणामध्ये चैत्रगौरीचा पाळणा, गणपती, समई, नाभी कमळ, कासव, शंख, सूर्य, चंद्र, गोपद्म, सर्प, त्रिशूळ, स्वस्तिक, कमळ, गदा, चक्र, इ. हिंदू धार्मिक तसेच नैसर्गिक आकृत्या काढल्या जातात. यामध्ये प्रत्येक महिन्यात साज-या होणा-या विविध सण व व्रतांचे अंकन रांगोळीच्या माध्यमातून केले जाते. मध्यभागी झोपाळ्यात बसलेल्या देवीचे चित्र, राधाकृष्ण, तुळशी अशी चित्रे चैत्रांगणात काढली जातात.
 
माहेरवाशिण देवीला नैवेद्यात कैरी घालून वाटलेली हरबर्‍याची डाळ, कैरीचे पन्हे, बत्तासे, टरबूज, कलिंगड यासारखी फळे, भिजवलेले हरभरे असे पदार्थ अर्पण केले जातात. सर्व कौतुक होत असताना अखरे अक्षयतृतीयेला गौर पुन्हा सासरी जायाला निघते तेव्हा तिला खीर-कानोला, दहीभात, आंब्याचा रस असा नैवेद्य दाखवला जातो.
 
भारतात चेत्रगौर अन्यत्र प्रांतात पण साजरी केले जाते. 
कर्नाटक- चैत्रगौर ही कर्नाटकातही मांडली जाते. गौरीचे पूजन करून सुवासिनींची भिजवलेल्या हरभऱ्याने ओटी भरतात. 
 
राजस्थान - या प्रांतात होळीच्या दुसऱ्या दिवशी चैत्र महिना सुरु होतो. त्या दिवशी गणगौर बसवितात. होळीची 
राख आणि शेणाचे 16 मुटके करतात. भिंतीवर 16 हळद आणि 16 कुंकुवाच्या टिकल्या काढतात. त्याखाली मुटके मांडले जाते. हे मुटकेचं गौरीचे प्रतीक होय. गव्हाच्या ओंब्या, हळदीने याची पूजा करतात. ज्वारीच्या कणसाला पांढरा दोरा बांधून गौरीच्या मुटक्या जवळ कणसे ठेवली जाते. हे कणसे म्हणजे शंकराचे प्रतीक असे. एका कणसाला लाल पिवळा दोरा आणि केसांचा गुंता बांधला जातो. हे गौरीचे प्रतीक मानले जाते. या गौरीला चुरमा आणि लिंबाच्या डहाळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो.

Edited By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments