मग रायातें म्हणे संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो । कृष्ण सागंती जो । योगरुप ॥ १॥ सहजें ब्रह्मरसाचें पारणें । केलें अर्जुनालागीं नारायणें । की तेचि अवसरी पाहुणे । पातलों आम्ही ॥ २॥ कैसी दैवाची थोरी नेणिजे । जैसें तान्हेलिया तोय सेविजे । कीं तेंचि चवी करुनि पाहिजे...