साईबाबा शिरडीत येण्यापूर्वी कुठे होते? शिरडीत आल्यावर ते शिरडी सोडून निघून गेले होते आणि पुन्हा एका वरातीसोबत येथे आल्यावर येथे स्थायी झाले. ते शिरडी सोडून कुठे निघून गेले होते? जाणून घ्या साईबाबांशी जुळलेले काही रोचक तथ्य:
1. साईंवर लिहिलेल्या तीन प्रमुख पुस्तके
1. 'श्री साई सच्चरित्र', लेखक श्री श्रीगोविंदराव रघुनाथ दाभोलकर. ही पुस्तक मूलतः: मराठीत लिहिलेली आहे. ही पुस्तक साईबाबा जिवंत असतानाच 1910 साली लिहायला सुरुवात केली गेली होती आणि 1918 साली साईबाबांच्या समाधिस्थ होयपर्यंत याचे लेखन सुरू होते.
2. 'ए यूनिक सेंट साईबाबा ऑफ शिरडी', लेखक श्री विश्वास बाळासाहेब खेर. ही पुस्तक साईबाबांचे मित्र स्वामी साई शरण आनंद यांकडून प्रेरणा घेऊन लिहिण्यात आली आहे. खेर यांनी साई यांची जन्मभूमी पाथरी येथे बाबांचे घर भुसारी कुटुंबाकडून चौधरी कुटुंबाला खरेदी करण्यात मदत केली होती. ज्यांनी हे स्थान साई स्मारक ट्रस्टसाठी खरेदी केले होते.
3. ही पुस्तक कन्नड भाषेत लिहिली गेली आहे ज्याचे नाव अज्ञात असून याचे लेखक श्री बीव्ही सत्यनारायण राव (सत्य विठ्ठला) असे आहे. विठ्ठला यांनी आपल्या आजोबांशी प्रेरित होऊन ही पुस्तक लिहिली होती. त्यांचे आजोबा साईबाबांच्या पूर्व जन्मी व या जन्मी अर्थात दोन्ही जन्माचे मित्र होते. या पुस्तकाचे इंग्रजीत अनुवाद प्रो. मेलुकोटेचे श्रीधर यांनी केले आणि या पुस्तकाचे काही प्रसंगाचे हिंदीत अनुवाद श्री शशिकांत शांताराम गडकरी यांनी केले. हिंदी पुस्तकाचे नाव आहे- 'सद्गुरू साई दर्शन' (एक बैरागी की स्मरण गाथा)।
2. साईबाबांचे जन्म स्थळ पाथरी
महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 सप्टेंबर 1830 रोजी झाला होता. साईंच्या जन्म स्थळी एक मंदिर आहे. त्यात बाबांची आकर्षक मूर्ती आहे. बाबांच्या या निवास स्थळी जुन्या वस्तू जसे भांडी, घट्टी आणि देवी-देवतांच्या मुरत्या आहे. जुन्या घराचे अवशेष सांभाळून ठेवण्यात आले आहे. ट्रस्टद्वारे हे घर साईबाबांचे वंशज रघुनाथ भुसारी यांच्याकडून 3 हजार रुपयात 90 रुपयांच्या स्टॅम्पवर खरेदी करण्यात आले होते.
3. साईबाबांच्या आई-वडिलांचे नाव
साईबाबांच्या वडिलांचे नाव परशुराम भुसारी आणि आईचे नाव अनुसूया असे होते. यांना गोविंद भाऊ आणि देवकी अम्मा असे ही ओळखले जात होते. काही लोकं वडिलांना गंगाभाऊ असेही हाक मारायचे. यांचे 5 पुत्र होते ज्यांचे नाव- रघुपती, दादा, हरीभाऊ, अंबादास आणि बलवंत असे होते. बाबा परशुराम यांची तिसरी संतान होते ज्यांचे नाव हरीभाऊ असे होते.
4. साईबाबा यांचे वंशज कोण आहेत?
साईबाबांचे वंशज आजदेखील औरंगाबाद, निजामाबाद आणि हैदराबाद येथे राहतात. साईंचे मोठे भाऊ रघुपती यांचे दोन पुत्र होते- महारुद्र आणि परशुराम बापू. महारुद्र यांचे दोन पुत्र आहे त्यातून रघुनाथजी यांच्याकडे पाथरी येथील घर होते. रघुनाथ भुसारी यांना 2 पुत्र आणि एक पुत्री आहे- दिवाकर भुसारी, शशिकांत भुसारी आणि मुलगी नागपूर येथे राहते. दिवाकर हैदराबादमध्ये आणि शशिकांत निजामाबाद येथे राहतात. परशुराम यांचे पुत्र भाऊ यांना प्रभाकर राव आणि माणिक राव नामक 2 पुत्र होते. प्रभाकर राव यांचे प्रशांत, मुकुंद, संजय नामक पुत्र आणि लता पाठक त्यांची मुलगी आहे. हे औरंगाबादमध्ये राहतात. माणिकराव भुसारी यांना 4 मुली आहेत- अनिता, सुनीता, सीमा आणि दया.
5. साईंचे शिक्षण आणि वडिलांची मृत्यू
हरिबाबू (साई) यांचे शिक्षण त्यांच्या वडिलांच्या सान्निध्यात पाथरी येथे झाले. पाथरीमधील गुरुकुलमध्ये ते गुरुसोबत शास्त्रार्थ करायचे. तसेच साईबाबांच्या घराजवळच मुस्लिम कुटुंब राहत असे. त्यांचे नाव चांद मिया असे होते आणि त्यांची पत्नी होती चांद बी. त्यांना संतान नव्हती. हरीभाऊ (त्यांच्या घरात अधिक काळ व्यतीत करत असे. चांद बी हरीभाऊ यांना आपल्या पुत्रासमान वागवायची. वडिलांच्या मृत्यूनंतर पूर्ण कुटुंब अस्त-व्यस्त झाले. असे म्हणतात की वली नामक एक सूफी फकीर बाबांना पाथरीहून घेऊन निघून गेले होते आणि साईंचे दुसरे भावंड औरंगाबाद, निजामाबाद आणि हैदराबाद निघून गेले.
6. वैकुंशा येथील आश्रमात बाबा
फकिरासोबत अनेक ठिकाणी फिरताना एकेदिवशी बाबा एकटेच पुन्हा पाथरी येथे पोहचले. तेथे पोहल्यावर त्यांना कळले की आता तिथे कोणीच नाही. शेवटी ते शेजारी राहणार्या चांद बी यांना भेटले. हरीभाऊ यांना बघून चांद बी खूश झाली. बाबांच्या राहण्याची व खाण्या-पिण्याची तरतूद करण्यासाठी ती त्यांना जवळीक गावा सेलू येथील वैंकुशा आश्रमात घेऊन गेली. तेव्हा बाबांचे वय 15 वर्ष असावे. वैकुंशाने त्यांना बघितल्याक्षणी गळे लावले आणि आपले शिष्य म्हणून स्वीकारले. आपल्या मृत्यूपूर्वी वैकुंशा यांनी आपल्या सर्व दिव्य शक्ती बाबांना सोपवल्या.
7. कफनी बाना आणि वीट
एकेदिवशी वैकुंशा आणि साईबाबा जंगलातून जात असताना काही लोकं बाबांवर विटा-दगड फेकू लागले. बाबांना वाचवण्यासाठी वैंकुशा समोर आले तर त्यांच्या कपाळावर एक वीट लागली. रक्त प्रवाह होऊ लागला तेव्हा बाबांने लगेच कपड्याने रक्त पुसले. वैंकुशा यांनी तेच कापड तीनदा गुंडाळून बाबांच्या डोक्यावर बांधून दिले आणि म्हटले की हे 3 गुंडाळे संसारातून मुक्त होण्यासाठी, ज्ञान व सुरक्षेसाठी आहे. ज्या विटेमुळे ते जखमी झाले ती वीट बाबांनी आपल्या पिशवीत ठेवून घेतली. नंतर जीवनभर बाबांनी ती वीट आपल्या उशाशी ठेवली. बाबा म्हणायचे की ज्या दिवशी ही वीट तुटेल, माझा श्वासही थांबेल असे समजून घ्याल.
8. शिरडीत बाबांच्या गुरुंनी जाळला होता दिवा
वैंकुशा यांनी बाबांना सांगितले होते की 80 वर्षांपूर्वी ते स्वामी समर्थ रामदास यांच्या चरण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी सज्जनगड गेले होते आणि परत येताना शिरडी येथे थांबले होते. तिथे एका मशीदीजवळ ध्यान केल्यावर त्यांना गुरु रामदास यांचे दर्शन झाले आणि त्यांनी म्हटले की तुमच्या शिष्यांमधून एक येथे निवास करेल आणि त्यामुळे हे स्थळ तीर्थक्षेत्र होईल. वैकुंशा यांनी सांगितले की तेथे मी रामदास यांच्या स्मृतीत एक दिवा लावला होता. तो दिवा कडुलिंबाच्या झाडाजवळ एका दगडाआड ठेवलेला आहे.
9. शिरडीत साईंचे आगमन
वैंकुशा यांच्या आज्ञेनुसार साई फिरत-फिरत शिरडीत पोहचले. तेव्हा शिरडीत एकूण 450 कुटुंब राहायचे. बाबांनी सर्वप्रथम खंडोबा मंदिरात दर्शन घेतले आणि वैकुंशा यांनी सांगितल्याप्रमाणे कडुलिंबाच्या झाडाजवळ पोहचले. भिक्षा मागितल्यावर बाबा झाडाभोवती असलेल्या फलाटावर बसायचे. काही लोकांनी उत्सुकतेमुळे विचारले की आपण येथेच का राहतात? तेव्हा बाबांनी म्हटले की माझ्या गुरुंनी येथे ध्यान केले होते म्हणून मी येथेच विश्राम करतो. काही लोकांनी त्यांच्या या गोष्टीची थट्टा केली. तेव्हा बाबा म्हणाले की शंका असल्यास ही जागा खोदून बघावी. गावकर्यांनी तसेच केले आणि तिथे एका दगडाआड जळत असलेले 4 दिवे सापडले.
10. बाबांचे शिरडीत पुन्हा आगमन
तीन महिन्यानंतर बाबा कोणालाही न सांगता शिरडी सोडून निघून गेले. लोकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला परंतू ते कुठेही दिसले नाही. भारतातील प्रमुख स्थानांचे भ्रमण करून 3 वर्षांनंतर बाबा चांद पाशा पाटलासोबत (धूपखेडा येथील एक मुस्लिम जहागीरदार) त्यांच्या मेहुणीच्या निकाहासाठी बैलगाडी बसून वराती म्हणून शिरडीत पुन्हा आले.
वरात थांबल्याठिकाणीच खंडोबाचे मंदिर होते. मंदिरात म्हालसापति नावाचे पुजारी होते. तेव्हा तरुण फकीरच्या वेषात बाबांना बघून म्हालसापति म्हणाले, 'आओ साई'... आणि तेव्हापासूनच लोकं बाबांना साई म्हणून ओळखू लागले. साईबाबा म्हालसापति यांना 'भगत' या नावाने हाक मारायचे.