Festival Posters

गजेंद्र मोक्ष स्त्रोत मराठी

Webdunia
गजा दे जो मुक्ती त्वरित विभु नक्रासि दमुनी
मुनी ज्याला शास्त्रीं हरि म्हणति त्यालाचि नमुनी
कथा ते संक्षेपें कथिन बरि पक्षींद्र गमना
मनामध्यें ध्यान द्विरदवरदा दुःख शमना ॥१॥
 
जळीं दांतें नक्र द्विरदपदमांसास्थि उकरी
करी प्राणत्यागी सुमति सुचली तों झडकरी
करी धांवा कीं वो सुलभ वर जो देवनिकरीं
करीं घे अर्पाया कमळ पदपद्यें सुखकरी ॥२॥
 
 
नसे ठावा ब्रह्मा नच शिव हरा अथवा श्रीपति हरी
हरी जो तापातें उचलुनि कृपासिंधुलहरी
हरी वाटे काळा करिस विपती मृत्युभुजगा
जगाचा तूं ऐसा धनि कवण तो पाव मज गा ॥३॥
 
वदे दुःखी तेव्हां म्हणउनि कळे दिवनिकरा
करावा तो मुक्त स्वशरण गमे श्रीप्रियकरा
करीं चक्रें शस्त्र प्रभु उचलि यानीं खगमनीं
मनीं साक्षी तो ये गज जळज घे तो स्वनमनीं ॥४॥
 
असा मी तो आत्मा त्रिदशनिकरां वंद्य सकळां
कळाया ही ये त्यासह करि तया मुक्त विकळा
कळा प्रेतप्राय स्मरण करि त्यातें न अवधी
वधी नक्रातें त्या अवसरिं कृपाब्धी निरवधी ॥५॥
 
मृताच्या त्या तोंडामधुनि पद तो हा झडकरी
करी तें वोढे ना प्रभुच करुणा मागुति करी
करीं दोंपायातें सह उचलि यानीं सुखकरी
करींद्रा सारुप्य त्वरितगति दे मुक्ति निकरीं ॥६॥
 
भुजा चारी पीतांबरधर असी मूर्ति बरवी
रवी जाणों हातीं रथचरण तें दीप्ति मिरवी
गजा एके हातीं जळजयुग दोहीं शुभकरीं
करींद्रा सारुप्य त्वरितगति दे मुक्ति निकरी ॥७॥
 
स्तवी ब्रह्मा शंभू त्रिदशपति तो मुक्तिहि नवा
नवा भक्तीची हे गति दिधलि ज्याला अभिनवा
न वाटे त्यां सर्वा हरिविण धनी आणिक जगा
जगाया हे भक्ती प्रभुच म्हणती ईश मज गा ॥८॥
 
पदें तेव्हां सर्वद्विरदवरदा श्रीपति असा
असारीं संसारीं गजगति असी गातचि असा
पहाटे हें गाय प्रतिदिनिंहि माझें चरित रे
तरे दुःखाब्धी तो नपरमपदींहूनि उतरे ॥९॥
 
गजाची जे मुक्ती क्रमुनि इतरां शक्ति नजनीं
जनीं गाती त्याला फळ परम या विष्णुभजनीं
जनीं ध्वंसस्वामी करि भजक हो गातचि असा
असारीं संसारीं म्हणुनि विनवी वामन असा ॥१०॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

चैत्र नवरात्री 2026: कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी?

चैत्र नवरात्री 2026 घटस्थापना, अष्टमी-नवमी आणि रामनवमी कधी?

बुधवारी करा गणपतीची ही खास पूजा; सर्व अडथळे दूर होतील

गुढी पाडवा २०२६: घर सजावट आयडिया, गुढी उभारणे आणि नवीन वर्षाचे संकल्प

Gudi Padwa 2026 गुढी पाडवा २०२६ तारीख, शुभ मुहूर्त, महत्त्व आणि साजरे करण्याची पद्धत

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

पुढील लेख
Show comments