Festival Posters

भूपाळी गंगेची

Webdunia
उठोनियां प्रातःकाळीं । वदनीं वदा चंद्रमौळी ।
श्रीबिंदुमाधवाजवळीं । स्नान करा गंगेचें । स्नान करा गोदेचें ॥ ध्रु ॥
 
स्नानदान जया अंतरीं । घडेल भागीरथीच्या तीरीं ।
हरि कृपा करिल त्यावरी । ऐसें माहात्म्य गंगेचें ॥ (गोदेचें) ॥ १ ॥
 
भागिरथीचें स्नान करा । हृदयीं स्मरा गंगाधरा ।
चुकेल चौर्यांनशींचा फेरा । ऐसें महात्म्य गंगेचें ॥ २ ॥
 
गंगा आहे स्वर्गावरतीं । पाताळीं ते भोगावती ।
मृत्युलोकीं हे विख्याती । ऐसें माहात्म्य गंगेचें ॥ ३ ॥
 
कृष्णावेण्या तुंगभद्रा । शरयू कालिंदी नर्मदा ।
भीमा भामा मुख्य गोदा । करा स्नान गंगेचें ॥ ४ ॥
 
व्यास वाल्मीकि नारदमुनि । अत्रि वसिष्ठ आणि जैमिनी ।
गुरुदत्त येति माध्यान्हीं । ऐसें माहात्म्य गंगेचें ॥ ५ ॥
 
आली आषाढी एकादशी । चला जाऊं पंढरिसी ।
पांडुरंगाच्या चरणापाशीं । दावी माहात्म्य गंगेचें ॥ ६ ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

६ जानेवारी रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी, व्रत- पूजा विधी आणि महत्तव जाणून घ्या

श्री गणपतीची आरती

आरती मंगळवारची

चतुर्थी व्रत विशेष का आहे? उपवास केल्याने काय होते?

Artihara-stotram आर्तिहर स्तोत्रम् श्रिधर अय्यावाल्

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments