हिंदू धर्मात प्रत्येक तिथी आणि व्रताला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशी व्रताचे विशेष महत्त्वही सांगण्यात आले आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णूंची उपासना करण्यासाठी व्रत ठेवतात. हा दिवस श्री हरीला समर्पित आहे. असे म्हणतात की एकादशी व्रत हे सर्व व्रतांपैकी सर्वात कठीण व्रत आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी 2022 म्हणून ओळखले जाते. या वेळी 12 फेब्रुवारीला जया एकादशी येत आहे.
या दिवशी श्री हरींची मनोभावे पूजा केल्याने देव लवकर प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. इतकेच नाही तर या दिवशी रात्री जागरण केल्याने व्यक्तीला बैकुंठ प्राप्त होते, अशीही मान्यता आहे. जर तुम्हालाही श्री हरीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर पूजेच्या वेळी तुम्ही विष्णू चालीसा पाठ (Vishnu Chalisa Path) आणि आरती (Vishnu Aarti) करावी.