Kaal Bhairav Jayanti 2024: आता कार्तिक पौर्णिमेनंतरचा हिंदूंचा सर्वात मोठा सण म्हणजे काळभैरव जयंती. आणि काल भैरव जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी काल भैरवाचा अवतार झाला होता. काल भैरव जयंती 23 नोव्हेंबर 2024 मध्ये शनिवारी साजरी केली जात आहे.
कालभैरव जयंतीचे दुसरे नाव कालाष्टमी आहे आणि या दिवशी भगवान शिवाचा उग्र अवतार असलेल्या कालभैरवाची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे. मान्यतेनुसार काल भैरवांचा जन्म प्रदोष काळात मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमीला झाला होता, म्हणून याला भैरव अष्टमी असेही म्हणतात. या दिवशी व्याप्पिनी अष्टमीच्या मध्यरात्री कालभैरवाची पूजा करावी.
कालभैरव जयंती पूजन विधि Kaal bhairav Puja Vidhi
- काल भैरव जयंतीला ब्रह्म मुहूर्ता नित्य क्रियांपासून निवृत्त होऊन स्नान करुन स्वच्छ वस्त्र धारण करावे.
- आता लाकडी पाटावर शिव-पार्वतीचे चित्र स्थापित करावे.
- नंतर काल भैरवाचे चित्र स्थापित करावे.
- आचमन करुन देवाला गुलाबाची माळ घालावी आणि पुष्प अर्पित करावे.
- चौमुखी दीवा लावून गुग्गल धूप जाळावी.
- अबीर, गुलाल, अष्टगंध याने सर्वांनी तिलक करावे.
- हातात गंगाजल घेऊन व्रत संकल्प घ्यावे.
- शिव-पार्वती आणि भैरव पूजन करुन आरती ओवाळावी.
- पितरांचे स्मरण करुन त्यांचे श्राद्ध करावे.
- व्रत पूर्ण झाल्यावर काळ्या कुत्र्याला गोड पोळी किंवा कच्चं दूध पाजावं.
- अर्द्धरात्री पुन्हा धूप, काळे तीळ, दिवा, उडीद आणि मोहरीच्या तेलाने काल भैरवाची पूजा करावी.
- या दिवसी व्रत-उपास करत रात्रभर भजन-कीर्तन करावे आणि भैरव यांचे महिमा गान करावे.
- सोबतच या दिवशी शिव चालीसा, भैरव चालीसा पठण करावे.
- भैरव जयंतीला त्यांचे मंत्र मंत्र 'ॐ कालभैरवाय नम: जपावे.