Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय एकविसावा

Webdunia
बुधवार, 19 जून 2024 (11:31 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥
म्हणे देवाधिदेव ॥ व्रताचा महिमा सांगावा ॥ पुरुषोत्तमा देवाधिदेव ॥ मेघ:श्यामा सुखमूर्ती ॥१॥
भागीरथी जळांत ॥ गाय गुंतली अकस्मात ॥ शिंगें गुंतोनी वृक्ष अडकत ॥ गाय मृत्यु पावली ॥२॥
मग ते गाईसी जन्म झाला ॥ उत्तम ब्राह्मणाच्या कुळाला ॥ सर्वांग अवयव सकळा ॥ परी मुख श्रृंगे गाईचें ॥३॥
ते गौमुखी कन्या पाहूनी आश्चर्य करिती सकळ जन ॥ म्हणती कोण पर्णील ईजलागुन ॥ श्रृंगें करुन भेदील हे ॥४॥
ऐसें विचारुन सकळ ॥ न मागती गांवकरी ॥ विप्र मनी आनंद आढळला ॥ जन्मकर्म ठाऊकें ॥५॥
द्वादशवर्षे पर्यंत ॥ तीस न मानी कोणी गांवात ॥ मग ऋषी मनांत विचारीत ॥ स्नाना भागीरथी जावा ॥६॥
शिष्य एक भाविक जाण ॥ त्यास ऋषी बोले वचन ॥ म्हणे सखया सर्वज्ञ ॥ वचन ऐकें सर्वदां ॥७॥
शिष्य उभा हस्त जोडून ॥ गुरु बोले ती अमृतवचन ॥ भागीरथी तटीं ग्राम पूर्ण ॥ नाम कैलास तयाचें ॥८॥
त्या ग्रामाचे संनिधानी ॥ वृक्ष औदुंबराचे असती दोन्ही ॥ त्याचे संधी शीर अडकोनी ॥ राहिलें आजपर्यंत ॥९॥
कंठापासून अवयव सर्व ॥ भागीरथींत पडले आहे ॥ तेणीं ईचें शरीर उत्तम होय ॥ मुखश्रृंगे गाईचें ॥१०॥
तेथून शीरकमळ काढोनी ॥ टाकिसी जरी भागीरथी जीवनी ॥ इकडे इचें मुख तत्क्षणीं ॥ उत्तम होईल निर्धारें ॥११॥
ऐसें गुरुनाथ सांगतां ॥ शिष्य निघाला तत्वतां ॥ कैलासग्रामा भोंवता ॥ औंदुंबर शोधितसे ॥१२॥
औदुंबराचे संधीमधून ॥ शिकाढिले न लागतां क्षण ॥ टाकिले भागीरथींत नेऊन ॥ इकडे शुध्दमुख जाहले ॥१३॥
शुध्दमुख चंद्रवदन ॥ झाली तेव्हां विप्रकन्या ॥ मागावयालागीं जाण ॥ आले तेव्हां असंख्यात ॥१४॥
परी ऋषी म्हणे त्यासी ॥ यंदां कर्तव्य नाहीं आम्हांसी ॥ ऐसा नेम वदतां पुत्रासी ॥ क्षोभ बहुत आलासे ॥१५॥
म्हणे मी देतों लग्न करुन ॥ मातापुत्र एक होवोनी ॥ ऋषी वचन न मानोनी ॥ कन्या देते जाहले ॥१६॥
गावांत एक विप्र धनवंत ॥ त्याच्या पुत्राप्रती देत ॥ ऋषी मनीं चिंताग्रस्त ॥ म्हणे कैसें करावें ॥१७॥
म्हणे धांवधांव चक्रपाणी ॥ माझे व मानीत पुत्र कामिनी ॥ धनवंता घरीं कन्या देऊनी ॥ मजला असत्य करिताती ॥१८॥
जो म्यां शिष्य पाठविला ॥ त्यास म्यां दिधली ही अबला ॥ तो सखा केव्हां देखेन डोळां ॥ तूंच दयाळा दाखविसी ॥१९॥
ऐसा ऋषी धांवा करीत ॥ तों प्रसन्न होवोनी भगवंत ॥ विप्रजागी बोले मात ॥ धर्मशास्त्र ऐसें असे ॥२०॥
ऐशा स्त्रीचा त्याग करितां ॥ दोष नसे तत्वतां ॥ जिचें वचन पती तत्वतां ॥ त्यागीतां दोष नसे कांही ॥२१॥
ऐसें शास्त्र बोलत ॥ ऐशाविषयीं दृष्टांत ॥ कर्दम शिवध्यानीं रत ॥ अनुष्ठानासी तो गेला ॥२२॥
गृही कामिनी वाट पाहत ॥ येथें नवल काय वर्तलें ॥ झाडाखालीं ऋषी ध्यानस्त ॥ नेत्र लाऊनी बैसला ॥२३॥
ज्या वृक्षाखालीं कर्दमऋषी ॥ तेथें चिमणाचिमणी पक्षी ॥ चिमणी चुकली मार्ग लक्षी ॥ वृक्ष आपुला न दिसे म्हणुनी
॥२४॥
चिमणा वाट पाहतां जाण ॥ रात्र गेली निघोन ॥ चिमणीसीच क्रोध वचन ॥ ममगृहीं येऊं नको ॥२५॥
ही म्हणे रात्री चुकली ॥ हा म्हणे पाप झालें ॥ म्हणोनी ताडन केलें ॥ ते म्हणे शपथ करत्यें मी ॥२६॥
पाप मी नेणें सर्वथा ॥ तुमचे चरण सेवितें आतां ॥ तो म्हणे मी न मानी तत्वतां ॥ दुसरी शपथ दे कांही ॥२७॥
ते म्हणे हा कर्दम ऋषी ॥ याच्या मस्तकीं पापाच्या राशी ॥ त्या मज घडोत अहर्निशीं ॥ म्यां कोणासी भाषण केले
असेल ॥२८॥
ऐसें ऋषीनें ऐकोन ॥ कर्दम बोले हात जोडोन ॥ कोन दोष मजलागुन ॥ घडले तें सांगे कां ॥२९॥
ते म्हणे तुझी कामिनी ॥ मासमासी ऋतु पावोनी ॥ चिंतीत असे तुज मनी ॥ तेणें दु:खें कष्टी बहु ॥३०॥
प्रतीमासी बाळहत्या बारा ॥ तुज घडती ऋषीश्वरा ॥ कर्दम आला घाबरा ॥ दोष खरा मज घडला ॥३१॥
मग तो कर्दम मुनी तेथें आला ॥ अनुष्ठान सारोनि ॥ भोगतीसी देतसे ॥३२॥
शास्त्र मर्यादा ऐसी आहे ॥ दुष्ट स्त्री त्यागीता दोष नाहीं ॥ तैसेच पुत्र मित्र तेही ॥ त्यागितां दोष नसेची ॥३३॥
ऐसी स्त्री पुत्र ऐकून ॥ स्त्रिपुत्र दोघे येऊण ॥ ऋषीचे चरण वंदुन ॥ वचन तेव्हां बोलती ॥३४॥
आले तुमच्या मनासी ॥ कन्यां द्यावी श्रीकृष्णासी ॥ तरी ते मानले आम्हासी ॥ धनिकासी न द्यावी ॥३५॥
ती कन्यां शिष्यासी देऊन ॥ तेणे संतुष्ट पितृमन ॥ आनंदे झालें लग्न ॥ च्यार दिवस पर्यंत ॥६६॥
मग आले कोकिळाव्रत ॥ कन्या नेमेसी करीती ॥ तेणें आनंदे नांदत ॥ धन्य धन्य समृधी ॥३७॥
ऐसें कोकिळा वृताचा महिमा ॥ म्यां सांगीतला तुम्हा ॥ द्रौपदी करिती झाली नेमा ॥ तेणें राज्य पावली ॥३८॥
धर्मा ऐकें सावधान ॥ पुढें कथा पुण्यपावन ॥ ऐकातां पाप निर्दाळन ॥ होय क्षण लागतां ॥३९॥
इति श्रीस्कंदपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्य ॥ एकविंशतिंतमोऽध्याय: अध्याय ॥२१॥ ओंव्या ॥३९॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥
॥ अध्याय २१ वा समाप्त: ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

सोमवारी महामृत्युंजय जप करणे आरोग्यासाठी फायदेशीर

आरती सोमवारची

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

पुढील लेख
Show comments