Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय तिसावा

Webdunia
बुधवार, 19 जून 2024 (11:44 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥
धर्म म्हणे जगन्नायका ॥ तूं भक्तासी सुखदायका ॥ विधवेचें धर्म जगपाळका ॥ मजलागीं सांगावें ॥१॥
कृष्ण म्हणे धर्मालागून ॥ तूं ऐकें चित्त देऊन ॥ विधवेचे धर्म पूर्ण ॥ तुजलागीं सांग तों मी ॥२॥
पती पावलिया मरण ॥ तिनें हा रक्षावा धर्म जाण ॥ तयासी स्वर्गलोक तेणें करुन ॥ प्राप्त होय धर्मराया ॥३॥
पती पावलिया मरण ॥ केश न करावे रक्षण ॥ तयेचे करुन वपन ॥ यथाकाळीं करुनी ॥४॥
विधवेचा हाची धर्म पूर्ण ॥ एक वेळां करावें भोजन ॥ त्रिरात्र पंचरात्र उपोषण ॥ चंद्रायण व्रत करावें ॥५॥
एकादशीव्रत जाण ॥ तिनें करावें पूर्ण ॥ फळाहारें करुन ॥ देह आपुला रक्षावा ॥६॥
पयोव्रत आणि दधिव्रत ॥ मासोपवास फळव्रत ॥ रामनवमी सकळ व्रत ॥ तेही जाण करावें ॥७॥
पलंगी निजूं नये जाण ॥ करावें भूमिवरी शयन ॥ तेणें करुन मोक्ष साधन ॥ प्राप्त होय धर्मराया ॥८॥
तिनें आंगासी तेल जाण ॥ न लावावें धर्मा पूर्ण ॥ शरीरासी चंदन ॥ कदापि न लावावें ॥९॥
कुश उदकेंकरुन ॥ नित्य करावें तर्पण ॥ नामगोत्र उच्चारुन ॥ विधीकरुन करावे ॥१०॥
सदां करावें विष्णु पूजन ॥ तेणें धर्म होती पावन ॥ पतीचें करुनी ध्यान ॥ विष्णु पूजन करावें ॥११॥
स्नानदान तीर्थ सेवन ॥ सदा करावें विष्णु कीर्तन ॥ कार्तिकमासीं स्नान नेमें करुन करावें ॥१२॥
वैशाखमासीं कुंभदान ॥ कार्तिक मासी दिपदान ॥ माघमासीं तिळदान ॥ अगत्य करुनी करावें ॥१३॥
कर्पूर तांबूल दान ॥ आणिक करावें वस्त्रदान ॥ शितळ उदकें भरुन ॥ ब्राह्मणांसी पैं द्यावें ॥१४॥
आणिक द्यावें कर्दळी फळदान ॥ द्राक्षादिफळें करावीं अर्पण ॥ जेणें ब्राह्मण संतोषे पूर्ण ॥ तीं तीं दानें करावीं ॥१५॥
चातुर्मासीं नेम जाण ॥ विष्णु नेम आचरावा पूर्ण ॥ वांगी पलांडू लसून ॥ हें विधवेनें भक्षूं नये ॥१६॥
कार्तिक मासीं तैल्य टाकावें पूर्ण ॥ आणीक टाकावें सहज जाण ॥ कांश पात्राचा त्याग करुन ॥ पात्रीं भोजन करावें ॥१७॥
भोजन करावें मौन्य ॥ तेणें प्राप्त बहुत पुण्य ॥ देव गृहीं घंटा बांधून ॥ हें उद्यापन मौन्याचें ॥१८॥
भूमीवरी करावें शयन ॥ ब्राह्मणास द्यावें मंचकदान ॥ फळ त्यागितां पूर्ण ॥ फळदान करावें ॥१९॥
जी स्त्री धान्य त्यागील पूर्ण ॥ तिने करावें धान्यदान ॥ कोकिळाव्रतीं ॥ गौदान ॥ अलंकार वस्त्रें अर्पावीं ॥२०॥
एकीकडे सर्व दान ॥ कोकिळाव्रतीं दिपदान ॥ दीपदानाचा महिमा पूर्ण ॥ मोठा असे धर्मराया ॥२१॥
ब्राह्मणांसी पक्वान्नदान ॥ त्या पक्वान्नाची सांगतों खूण ॥ फेण्या करंज्या अनारिसे पूर्ण ॥ लाडूदान मोतीचूर ॥२२॥
बहुत सुवासिक अन्नें ॥ मालपोहे द्यावे दान ॥ पेढे बतासे साखर जाण ॥ घृतदान करावें ॥२३॥
कमळ द्यावें द्विजासी ॥ पानेंदान अर्पावी त्यासीं ॥ जायफळ लवंगा तांबोळेसी ॥ वेलदोडे जायपत्री ॥२४॥
उपायनें करावी अर्पण ॥ तेणी प्राप्त महापुण्य ॥ सुवर्णदानें करुन ॥ ब्राह्मणासी संतोषावें ॥२५॥
गंधपुष्पें करुन ॥ धुपदीप दाखवून ॥ नैवेद्य करावा अर्पण ॥ दक्षिणा पुढें ठेवावी ॥२६॥
पूजन करावें कोकिळेचें ॥ तेणे नासती पर्वत पापाचे ॥ ऐसें महिमान या व्रताचे ॥ किती सांगूं तुजलागी ॥२७॥
लक्ष्मीयुक्त नारायण ॥ पार्वतीयुक्त शिव कल्याण ॥ सावित्रीयुक्त ब्रह्मा जाण ॥ त्याचें पूजन करावें ॥२८॥
स्त्रियांनी भावना धरुन ॥ पतीस्वरुप भगवान ॥ नानाधर्मे करुन ॥ आदरें करुनी पुजावें ॥२९॥
विधवेचें आणीक धर्म ॥ बैलावर न आरोहण ॥ तांबूल न करावें भक्षण ॥ प्राण गेलिया जाण पैं ॥३०॥
आणिक कंचुकी परिधान ॥ कदापी न करावी जाण ॥ ऐसें धर्मपापनाशन ॥ तुजलागीं म्या कथियेलें ॥३१॥
ऐसें कोकिळा महात्म्य जाण ॥ म्या कथिलें तुजलागून ॥ ऐसें केलीया व्रत जाण ॥ सर्व पापें दूर होती ॥३२॥
इति श्रीस्कंदपुरणें ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्य ॥ त्रिंशतितमोऽध्याय: अध्याय ॥३०॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ ओव्या ॥३२॥
॥ अध्याय ३० वा समाप्त: ॥
॥ इति कोकिळामहात्म्य समाप्त: ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री दत्तगुरुशरणाष्टकम्- दत्तात्रेया तव शरणं

उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

मारुतीची निरंजनस्वामीकृत आरती

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments