Dharma Sangrah

मंगळवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

Webdunia
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 (06:58 IST)
मंगळवार हा देवीचा आणि श्री गजाननाचा वार समजला जातो.या दिवशी एक वेळा उपवास केला जातो. उपवास सकाळी धरून संध्याकाळी सोडला जातो किंवा सकाळी धरून संध्याकाळी उपवास केला जातो. या दिवशी गणपतीअथर्वशीर्षांची आवर्तने करतात.संकष्टनाशनव इतर गणपतीस्त्रोते वाचतात. मंगळवार देवीचा पण वार असतो.देवीची पण स्रोते वाचतात. मंगळाचे रत्नं प्रवाळ आहे. कुठल्याही क्षेत्रात विजयी करण्याचे सामर्थ्य ह्यात आहे.
 
मंगल दोषांवर प्रभावी उपाय
कर्ज न होण्यासाठी,लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी,घरात वादविवाद न होण्यासाठी,सर्वांचे कौटुंबिक विचार एक राहण्यासाठी,घर जमीन या संबधीत वाद-विवाद न होण्यासाठी,वास्तुदोष असल्यास तो जाऊन घरात भरभराट होण्या साठी,विवाहातील अडथळे दूर होऊन त्वरित विवाह होण्यासाठी देवी भागवत महापुराणात मंगलचंडी देवीची ही उपासना सांगितली आहे. पत्रिकेत मंगळाचा त्रास असल्यास ही उपासना अवश्य करावी.
 
विधी- दर मंगळवार,जमल्यास शुक्रवारी देखील सकाळी-दुपारी आणि रात्री हे स्रोत वाचावे.मसूर डाळ,गूळ,लालवस्त्र,व निरनिराळी लालरंगाची फळे गरिबांना दान करावी. असे 5 मंगळवार कार्यसिद्धी होईपर्यंत करावेत.
श्री मंगलचंडिकास्तोत्रम् 
ॐ ह्रीं श्रीं क्लीं सर्वपूज्ये देवी मङ्गलचण्डिके I 
ऐं क्रूं फट् स्वाहेत्येवं चाप्येकविन्शाक्षरो मनुः II 
पूज्यः कल्पतरुश्चैव भक्तानां सर्वकामदः I
दशलक्षजपेनैव मन्त्रसिद्धिर्भवेन्नृणाम् II
मन्त्रसिद्धिर्भवेद् यस्य स विष्णुः सर्वकामदः I
ध्यानं च श्रूयतां ब्रह्मन् वेदोक्तं सर्व सम्मतम् II 
देवीं षोडशवर्षीयां शश्वत्सुस्थिरयौवनाम् I 
सर्वरूपगुणाढ्यां च कोमलाङ्गीं मनोहराम् II 
श्वेतचम्पकवर्णाभां चन्द्रकोटिसमप्रभाम् I
वन्हिशुद्धांशुकाधानां रत्नभूषणभूषिताम् II 
बिभ्रतीं कबरीभारं मल्लिकामाल्यभूषितम् I
बिम्बोष्टिं सुदतीं शुद्धां शरत्पद्मनिभाननाम् II 
ईषद्धास्यप्रसन्नास्यां सुनीलोल्पललोचनाम् I 
जगद्धात्रीं च दात्रीं च सर्वेभ्यः सर्वसंपदाम् II 
संसारसागरे घोरे पोतरुपां वरां भजे II 
देव्याश्च ध्यानमित्येवं स्तवनं श्रूयतां मुने I
प्रयतः संकटग्रस्तो येन तुष्टाव शंकरः II 
शंकर उवाच रक्ष रक्ष जगन्मातर्देवि मङ्गलचण्डिके I
हारिके विपदां राशेर्हर्षमङ्गलकारिके II 
हर्षमङ्गलदक्षे च हर्षमङ्गलचण्डिके I 
शुभे मङ्गलदक्षे च शुभमङ्गलचण्डिके II
मङ्गले मङ्गलार्हे च सर्व मङ्गलमङ्गले I 
सतां मन्गलदे देवि सर्वेषां मन्गलालये II 
पूज्या मङ्गलवारे च मङ्गलाभीष्टदैवते I 
पूज्ये मङ्गलभूपस्य मनुवंशस्य संततम् II 
मङ्गलाधिष्टातृदेवि मङ्गलानां च मङ्गले I 
संसार मङ्गलाधारे मोक्षमङ्गलदायिनि II
सारे च मङ्गलाधारे पारे च सर्वकर्मणाम् I 
प्रतिमङ्गलवारे च पूज्ये च मङ्गलप्रदे II 
स्तोत्रेणानेन शम्भुश्च स्तुत्वा मङ्गलचण्डिकाम् I 
प्रतिमङ्गलवारे च पूजां कृत्वा गतः शिवः II
देव्याश्च मङ्गलस्तोत्रं यः श्रुणोति समाहितः I
तन्मङ्गलं भवेच्छश्वन्न भवेत् तदमङ्गलम् II
II इति श्री ब्रह्मवैवर्ते मङ्गलचण्डिका स्तोत्रं संपूर्णम् II 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Thai Amavasai 2026 थाई अमावसाई म्हणजे काय आणि या दिवशी काय शुभ मानले जाते?

रविवारी करा आरती सूर्याची

Mauni Amavasya Katha मौनी अमावस्या पौराणिक कथा

Mauni Amavasya 2026 मौनी अमावस्येला दुर्मिळ योगायोग: पितृदोषापासून मुक्तीसाठी सर्वात खास उपाय

शनिवारी खिचडी खाल्ल्याने शनिदेव का प्रसन्न होतात? ज्योतिषशास्त्रीय कारणे आणि फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments