Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शास्त्राप्रमाणे सूर्याला 'अर्घ्य' का वाहतात?

Webdunia
बुधवार, 15 एप्रिल 2020 (07:57 IST)
शास्त्रात पूजा करताना सूर्यास अर्घ्य देण्याचे महत्त्व विशद केले आहे. हाताच्या ओंजळीत पाणी (जल) घेऊन सूर्यासमोर तोंड करून सूर्यास जल समर्पित केले जाते. त्यालाच 'अर्घ्य' म्हटले जाते. वेदांमध्ये सूर्यास डोळ्याची उपमा दिली गेली आहे.

सूर्यात सप्तरंगी किरणे असतात. या सप्तरंगी किरणांचे प्रतिबिंब ज्या रंगात पडते तेथून ती किरणे परत येतात. केवळ काळा रंगच असा रंग आहे की ज्यातून सूर्य किरणे परत येत नाहीत.

आपल्या शरीरात विविध रंगांची विद्युत किरणे असतात. यामुळे ज्या रंगाची कमतरता आपल्या शरीरात असते त्या रंगाची ‍किरणे सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपणास मिळतात. डोळ्यांचे बुबळे काळी असतात. तेथून सूर्यकिरण परत जात नाही. यामुळे आवश्यक असणार्‍या रंगांच्या किरणांची कमतरता दूर होते.

वैज्ञानिकांनी हे सिध्द केले आहे की सूर्य किरणांचा प्रभाव पाण्यावर लवकर पडतो. यामुळे सूर्यास पाण्याचे अर्घ्य दिले जाते. सूर्य म्हणजे आकाशात बसलेला डॉक्टर आहे. सूर्याच्या सप्तरंगी किरणांमध्ये अदभूत रोगनाशक शक्ती आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सूर्य किरणांमध्ये औषधी गुणधर्म भरपूर आहेत. सूर्यकिरण अनेक रोग उत्पादक ‍विषाणूंचा नाश करतो. टिबीचे विषाणू उकळणार्‍या पाण्यात मरत नाहीत. पण सूर्यकिरणांनी त्वरीत नष्ट होतात. यावरूनच सूर्य किरणांमुळे कोणतेही विषाणू नष्ट होण्याबाबत शंकाच असू नये.

मानवाला निरोगी राहण्यासाठी जितकी शुध्द हवा आवश्यक आहे, तितकाच सूर्यप्रकाशही आवश्यक आहे. या प्रकाशाने मानवाच्या शरीरातील कमजोर असलेले अंग पुन्हा सशक्त आणि सक्रीय होते.

सूर्य किरणात प्रसन्नता-अप्रसन्नतेचे अणूही असतात. त्रिकाल संध्येचा संबंध सूर्याशी आहे. मुख्य संध्या म्हणजे सावित्री जप आहे. सावित्री सविताच्या अर्थात सूर्याच्या ऋचांचे नाव आहे. यामुळे संध्योपासना करताना सविताचे ध्यान केले जाते त्यावेळी अर्घ्य सूर्यास दिले जाते.

सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च (यजुर्वेद 7/42)। या मंत्राला सूर्याच्या स्थावर-जंगम पदार्थांचा आत्मा समजले जाते. जीवेत शरदः शतम्‌ (यजुर्वेद 36/24) पासून शंभर वर्ष जगण्याची, शंभर वर्ष बोलण्याची आणि ऐकण्याची प्रार्थना सुध्दा सूर्यालाच केली जाते.

एका अमेरिकी शास्त्रज्ञाने म्हटले आहे, की जर सूर्यापासून मिळणारा उब आमच्यात सुरक्षित रहात असेल तर आम्ही चारशे वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. ही उब आपणास सूर्याकडून प्राप्त होते. सूर्य नसताना सर्व जीवसृष्टी नष्ट होते. सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ ऊष्णतेशी नाही. त्याचा मानवाच्या आहाराशीसुध्दा आहे. वनस्पतींची पाने सूर्यकिरणांच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करतात. या घटकाविना पानात नैसर्गिक हिरवेपणा राहू शकत नाही. आपण दैनंदिन आहारात नेहमी हिरव्या भाज्यांचा समावेश करतो. या भाज्यांमध्येच मानवाच्या शरीरास आवश्यक पोषक घटक असतात. यामुळेच सूर्यप्रकाश मानवी जीवनासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रुपाने आवश्यक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

सरयू नदी का शापित आहे ? शिव का क्रोधित झाले होते जाणून घ्या

आरती गुरुवारची

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

Saphala Ekadashi Mantra 2024: सफला एकादशीचा उपवास करत असाल तर या मंत्रांचा अवश्य जप करा

मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments