Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Onam 2023 उत्साहाचा सण ओणम

Webdunia
ओणम केरळ राज्यातील एक कापणी उत्सव आहे. ह्या मासापर्यंत केरळमध्ये चांगली धान्य कापणी एकत्र होऊन जाते आणि त्याचा आनंद साजरा करण्यासाठी हा उत्सव साजर करण्याची परंपरा आहे. मल्याळी कॅलेन्डरच्या चिंगम मासात, म्हणजे मध्य ऑगस्ट किंवा मध्य सप्टेंबरच्या जवळपास हा सण साजर केला जातो.
 
पौराणिक कथेनुसार हा सण साजरा करण्यामागील कारण राजा बलि आणि श्री विष्णूचे वामन अवतार या कथेसोबत जोडलं जातं. राजा महाबली, प्राचीन केरळचे पौराणिक शासक, एक उदार आणि चतुर राजा होते, परंतु देव त्यांच्या लोकप्रियतेबद्दल असुरक्षित होते. महाबलीने देवांना देखील परास्त करून तिन्ही लोकांमध्ये स्वतःचं अधिपत्य स्थापित केलं होतं. अशात सगळे देव जणांनी भगवान विष्णूंना मदत करण्यास सांगितले म्हणून भगवान विष्णूंनी त्यांचा पाचवा अवतार "वामन अवतार" घेतला. ह्यामुळे केरळमध्ये त्यांच्या आवडत्या राजाच्या आगमनाच्या सन्मानात दरवर्षी ओणम साजरा केला जातो.
 
लोकं ह्या उत्सवाचे 10  दिवस खूप पवित्र मानून आनंदाने ही दिवस साजरे करतात. घराची झाड धूप केली जाते, फुलांनी घर सजवतात आणि रांगोळी बनवतात, ज्याला ते ‘पुकलम’ म्हणतात. पूकलम म्हणजे जमिनीवर फुलांची रंगीबेरंगी मांडणी. ह्यावेळी खाद्य पदार्थात पण विविधता असते. जसे ‘ओणम साद्य’ज्याचा मल्याळीमध्ये अर्थ 'भोज' असा असतो हे पदार्थ तयार केले जातात. ह्या ओणम साद्यमध्ये 26 वेग-वेगळे खाद्य पदार्थ असतात.
 
ह्या उत्सवात जास्ततर महिला पांढर्‍या आणि गोल्डन रंगाची साडी, ज्याला 'कसावू साडी' म्हणतात ही नेसतात. हे केरळच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक आहे आणि त्यात असलेली आकर्षक डिझाइन आणि आरामदायक कापड महिलांमध्ये लोकप्रिय आहे.
 
ह्या उत्सवात इतर वेग-वेगळे कार्यक्रम किंवा स्पर्धा आयोजित केल्या जातात ज्यांचा लोकं खूप आनंद घेतात. काही प्रसिद्ध कार्यक्रम किंवा स्पर्धापैकी- 
 
"अत्तच्चमयम" किंवा "अथाचमायम" - हत्ती परेड, एर्नाकुलम जिल्ह्यातील थ्रीपुनिथुरा येथे आयोजित अथाचमयम परेड केरळमधील ओणम उत्सवाची सुरुवात दर्शवते. या परेडमध्ये सजवलेले हत्तींची परडे, ढोल, ताल आणि लोक संगीतसोबत रंगीबेरंगी कपडे घातलेले, मुखवटे घातलेले लोक असतात .
 
"वल्लमकली"- सर्प नाव स्पर्धा, केरळमधील सर्वात जुनी परंपरांपैकी एक आहे. ह्याच्यात 100 पेक्षा जास्त लोकं 30 -35 मीटरची नावाला चालवतात. ऊर्जेने भरलेल्या या स्पर्धेत प्रत्येक माणूस संपूर्ण जोशमध्ये दिसून येतो.
 
"पुली काली"- वाघाचे नृत्य, ही केरळची लोककला आहे जी ओणमच्या चौथ्या दिवशी मुख्यतः केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात साजर केली जाते. ह्याच्यात नृत्यक पूर्ण शरीरावर वाघाची आकृती काढून नृत्य करतात. हा उत्सव "वाघांच्या नाटक" बद्दल आहे आणि ह्याची थीम वाघांच्या शिकारवर असते.
 
ह्या व्यतिरिक्त लोक त्यांचे प्रिय राजा महाबलीच्या आगमनात स्वागत गीत गातात आणि पूजन करतात. ओणम सण हा दहा दिवस चालतो आणि या दहा दिवसात केरळच्या संस्कृतीचे आणि सौंदर्याचे भरभरुन प्रदर्शन पाहाण्यासाखरे असतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)

सरयू नदी का शापित आहे ? शिव का क्रोधित झाले होते जाणून घ्या

आरती गुरुवारची

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

Saphala Ekadashi Mantra 2024: सफला एकादशीचा उपवास करत असाल तर या मंत्रांचा अवश्य जप करा

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments