श्रीगणेशाय नम: । श्रोते म्हणती नवल । ऎकता याचे रसाळ बोल । अति अनुभव आणि सखोल । येताती डोल प्रेमाचे ॥ १॥ मग म्हणती कविपोषका । थोर मिळविलें सुखा । पार नाहीं आजिचिया हरिखा । कथा सांग कां नि:शंक ॥ २ ॥ महाप्रसाद जी आतां । म्हणॊनि चरणीं ठेविला माथा...