श्रीवासुदेवाय नम: ॥ आपुले आर्तीचे अंजन । शुद्धसत्वाचे पत्र जाण । बुद्धिबोधे लेखन । वर्णाक्षरीं अक्षर ॥ १ ॥ मनोवेगाचा पैं वारु । त्यावरी बैसविला द्विजवरू । कृष्णापासी सत्वरू । समूळ मूळ पाठविला ॥ २ ॥ माझे पूर्णपुण्ये तूं द्विजवरु । कृष्णप्राप्तीसी मज तूं गुरु । म्हणवोनि केला नमस्कारू ।...