Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा
Webdunia
शुक्रवार, 21 मार्च 2025 (20:55 IST)
Saint Balumama Information : महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि थोर संत म्हणजे संत बाळूमामा होय. बाळूमामा यांचा जन्म 1892 मध्ये झाला होता बाळूमामा यांचे मूळनाव नाव हे बाळप्पा होते बाळूमामा यांचे मुळगाव हे बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोल हे होते.  बाळूमामा यांच्या वडिलांचे नाव श्री मयप्पा आरभावे होते व आईचे नाव सत्यव्वा होते. 
ALSO READ: Sant Damajipant Information संत दामाजीपंत
संत बाळूमामा यांचा जन्म धनगर कुटूंबात झाला होता बाळूमामा यांचा शर्ट, धोतर, पगडी आणि त्यावर घोगडी असा पेहराव होता यासोबत ते पायात कोल्हापुरी चप्पल घालायचे. बाळूमामा यांना सर्व लोक बाळूमामा म्हणून हाक द्यायचे बाळूमामा आपल्या सोबत बकऱ्यांचा कळप घेऊन गावोगाव फिरत असत संत बाळूमामा यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक चमत्कार केले तसेच भक्तीचा मार्ग लोकांना दाखवला.  संत बाळूमामांचा पंचमहाभूतांवर अधिकार होती.  बाळूमामा यांना गरिबांबद्दल खूप आपुलकी वाटायची याच आपुलकीमधून त्यांनी 1932 मध्ये भंडारा उत्सव करण्यास सुरवात केली.  या भंडाऱ्यामध्ये गरीब लोक पोटभर जेवू शकतील असा त्यांचा उद्देश होता.  संत बाळूमामा यांच्या सान्निध्यात अनेक लोकांचा उद्धार झाला बाळूमामा हे एक थोर अध्यात्मिक व्यक्ती होते त्यांनी अनेकांचे कल्याण केले आज देखील लोक त्यांचा सन्मान करतात त्यांची भक्ती करतात.    
 
तसेच बाळूमामा यांनी आपल्या आईच्या आणि वडिलांच्या आग्रहाखातर त्यांची बहीण गंगूबाई यांची मुलगी सत्यवती यांच्यासोबत विवाह केला होता. दोघांनी कौटुंबिक परंपरेनुसार मेंढपाळचा आपला व्यवसाय पुढे नेला बाळूमामा यांनी मुळे महाराज यांच्या चरणांना आपले गुरु मानले. तसेच बाळूमामा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील गाव गाव फिरायचे  यामुळे ते संत म्हणून नावारूपास आले त्यांना प्रसिद्धीची अपेक्षा न्हवती भक्तांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक चमत्कार केले तसेच कन्नड आणि मराठी भाषांमध्ये सर्वांना न्याय, नैतिकता आणि धार्मिक पालनाचा उपदेश बाळूमामा द्यायचे.   
ALSO READ: खंडोबा मंदिराचे रहस्य: येथे भाविक दातांनी उचलतात ४२ किलोची सोन्याची तलवार
संत बाळूमामा यांना पावलापावलावर चमत्कार करावे लागले. कारण अनेक निदकांनी त्यांची निंदा केली. कारण चमत्कार केल्याशिवाय जगात कोणताही माणूस आदर किंवा महत्त्व मिळवू शकत नाही. संत बाळूमामा यांच्या चेहऱ्यावर प्रखर तेज होते जणू सृष्टीवरील चालतेबोलते भगवंत होते.  संत बाळूमामा यांनी एक सामान्य व्यापारी प्रमाणे कुटुंब परंपरेपासून सुरु असलेला त्यांच्या व्यवसाय केला बाळूमामांनी मेंढपाळ व्यवसाय करीत गावोगाव भक्तीचा प्रचार केला लोकांच्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर केला.  
 
संत बाळूमामा यांनी श्रावण वद्य चतुर्थी शके १८८८ म्हणजेच १९६६ मध्ये अखेरचा श्वास घेतला. तसेच आदमापुर मध्ये 'सद्गुरु संत' बाळूमामा यांची समाधी आहे.  संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी भक्त दुरदुरून येतात तसेच मंदिरामध्ये मामांच्या उजव्या बाजूलापरमहंस मुळे महाराजांची प्रतिमा आहे. तर डाव्या बाजूला विठ्ठल रखुमाईची प्रतिमा आहे.संत बाळूमामा यांच्या मंदिरात देणगी मागत नाही भक्त मनोभावे येथे दान देतात  तसेच मामांच्या समाधी मंदिराला सुंदर कोरीवकाम केलेले दगडी प्रवेशद्वार आहे   तसेच मंदिराच्या मागे धर्मशाळा असून भाविक याठिकाणी अराम करू शकतात तसेच मामांच्या मंदिरासमोर पुष्कळ मोकळी जागा असून तिथे एक मोठा भव्यदिव्य दिवा आहे व पिंपळाचे झाड आहे. 
ALSO READ: तुकाराम बीज दिन विशेष संत तुकाराम यांची माहिती जाणून घ्या
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गुढीपाडव्याला या १० चुका करू नका

Friday Remedies: शुक्रवारी या 4 गोष्टी करा, लक्ष्मीची विशेष कृपा मिळवा

Chaitra Navratri 2025: यावेळी चैत्र नवरात्र ९ ऐवजी ८ दिवसांची असेल, शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

Gudi Padwa Essay In Marathi गुढीपाडवा मराठी निबंध

Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

पुढील लेख
Show comments