rashifal-2026

भूपाळी संतांची

Webdunia
उठि उठि बा पुरुषोत्तमा । भक्तकामकल्पद्रुमा ।
आत्मारामा निजसुखधामा । मेघश्यामा श्रीकृष्णा ॥ध्रु.॥
 
भक्तमंडळी महाद्वारी । उभे निष्ठत श्रीहरी ।
जोडोनिया दोन्ही करी । तुज मुरारी पाहावया ॥१॥
 
संतसनकादिक नारद । व्यास वाल्मीकि ध्रुवपह्लाद ।
पार्थ पराशर रुक्मांगद । हनुमान अंगद बळिराजा ॥२॥
 
झाला प्रातःकाळ पूर्ण । करी पंचांग श्रवण ।
आला मुद्‌गलभट ब्राह्मण । आशीर्वचन घे त्याचे ॥३॥
 
तुझा नामदेव शिंपी । घेउनि आला आंगडे टोपी ।
आता जाऊ नको बा झोपी । दर्शन देई निजभक्तां ॥४॥
 
नानापरिचे अलंकार । घेऊनि आला नरहरि सोनार ।
आला रोहिदास चांभार । जोडा घेऊनि तुजलागी ॥५॥
 
सुगंध सुमने पुष्पांजुळी । घेऊनि आला सांवता माळी ।
म्हणे श्रीरंगा पदकमळी । अनन्यभावे समर्पू ॥६॥
 
कान्हुपात्रा नृत्य करी । टाळछंदे साक्षात्कारी ।
सेना न्हावी दर्पण करी । घेउनि उभा राहिला ॥७॥
 
लिंबुर हुरडा घेउनि आला । तो हा माणकोजी बोधला ।
दर्शन द्यावे बा ! त्याजला । भक्त भोळा म्हणऊनी ॥८॥
 
मिराबाई तुझेसाठी । दूध-तुपे भरुनी वाटी ।
तुझे लावावया ओठी । लक्ष लावुनी बैसली ॥९॥
 
नामदेवाची जनी दासी । घेऊनि आली तेल-तुपासी ।
तुज न्हाऊ धालावयासी । उभी ठेली महाद्वारी ॥१०॥
 
गूळ-खोबरे भरुनी गोणी । घेउनि आला तुकया वाणी ।
वह्या राखिल्या कोरडया पाणी । भिजो दिल्या नाही त्वा ॥११॥
 
आला चोखामेळा महार । स्वामी करीतसे जोहार ।
त्याचा करोनिया उद्धार । संतमेळी स्थापिला ॥१२॥
 
हरिभजनाविण वाया गेले । ते नरदेही बैल झाले ।
गोर्यााकुंभारे आणिले । खेळावया तुजलागी ॥१३॥
 
गरुडपारी हरिरंगणी । टाळमृदुंगाचा ध्वनी ।
महाद्वारी हरिकीर्तनी । तल्लिन कान्हा हरिदास ॥१४॥
 
निजानंदे रंगे पूर्ण । सर्वही कर्में कृष्णार्पण ।
श्रीरंगानुजतनुज शरण । चरणसेवा करीतसे ॥१५॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Makar Sankranti Recipes मकर संक्रांतीला बनवले जाणारे काही खास पदार्थ

Makar Sankranti 2026 Wishes in Marathi मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

Ekadashi on Sankranti षटतिला एकादशीला मकर संक्रांतीचा दुर्मिळ योग; तांदूळ आणि तीळ दान करावे का?

मकर संक्रांती 2026 मुहूर्त, पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, आरती

मकर संक्रांती २०२६: संपूर्ण माहिती, तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्व

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments