शनिवार : हा शनीचा व मारुतीचा वार आहे. या दिवशी एक वेळ उपवास करतात. सकाळी किंवा संध्याकाळी केंव्हाही सोडला तरी चालतो. या दिवशी शनिमाहात्म्य, शनी प्रार्थना, शनिष्टक, मारुतीची स्तोत्रे वगैरे वाचतात. शनीला व मारुतीला तेल घालतात व नारळ फोडतात. साडेसाती चालू असता शनिमाहात्म्य वाचतात. शनीची व मारुतीची मूर्ती एकाच देवळात असते किंवा स्वतंत्रही असते. इंद्रनील हे शनीचे रत्न आहे. हे रत्न लाभले तर चांगलाच फायदा होतो. पण न लाभल्यावर नुकसान होण्याचीही भीती असते. इतरांचे मन जिंकण्याची शक्ती या रत्नात आहे.