Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिव चतुर्दशी: महत्व, मंत्र, कथा, उपासनेची पद्धत

Webdunia
बुधवार, 7 जुलै 2021 (15:54 IST)
हिंदू धार्मिक शास्त्रानुसार, शिव चतुर्दशी उत्सव प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तारखेला साजरा केला जातो, तसेच हा शिवरात्रि दिवस म्हणून देखील मानला जातो. भगवान शिव चतुर्दशी तिथीचे स्वामी आहेत. या दिवशी भगवान शिवपूजनाबरोबरच शिव कुटुंबातील सर्व सदस्यांची पूजा केली जाते. या दिवशी रात्री भगवान शिवची पूजा केली जाते.
 
पूजा करण्याची पद्धत- 
यादिवशी सुख शांतीसाठी शिवाची पूजा केली जाते. या दिवशी शिवाला पुष्प अर्पण करणे आणि शिव मंत्रांचे जप करणे याचे फार महत्त्व मानले जाते. या दिवशी पूर्ण विधी करून 
शिवपूजा करून मंत्रांचे जप केल्यास एखादी व्यक्ती वासने, क्रोध, लोभ आणि आसक्ती इत्यादिच्या बंधनातून मुक्त होते. नावाप्रमाणेच शिवरात्र म्हणजे भगवान शिवची रात्र. जे लोक या 
दिवशी मासिक शिवरात्र उपवास करतात, त्यांनी शिव-पार्वतीची पूजा केल्यावर रात्री जागरण करावं आणि दुसर्‍या दिवशी सकाळी स्नान करून निवृत्त झाल्यानंतर ब्राह्मणांना दान व 
दक्षिणा देऊन उपवास पूर्ण करावा. नंतर पारायण करुन व्रत पूर्ण करावं.
 
शिव चतुर्दशी मंत्र
 
दररोज 1 माळ जपावी-
 
* शिव पंचाक्षरी मंत्र- 'ॐ नम: शिवाय'।
 
* शिव विशेष मंत्र- 'शिवाय नम:'।
 
मंत्र- 'ॐ नमः शिवाय शुभं शुभं कुरू कुरू शिवाय नमः ॐ'। 
 
जीवनात अडचण असल्यास, पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेकडे मुख करुन भक्तीने या मंत्राचा जप करावा. हा मंत्र सर्वात मोठी समस्या आणि अडथळे टाळतो.
 
* महामृत्युंजय मंत्र- 'ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्‍बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्‍योर्मुक्षीय मामृतात् ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ'। 
सर्व कष्टांपासून मुक्तीसाठी या मंत्राची एक माळ दररोज जपावी.
 
कथा
प्राचीन काळात एक शिकारी होता. जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते. 
त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनविले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती.
 
शिकारी ध्यानमग्न होऊन शिवा संबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी 
विचारले. शिकारी दुसर्‍या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला.
 
आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला. पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान-भुकेने व्याकूळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या 
झाडावर मचाण बांधू लागला. बेल-वृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते. शिकार्‍याला मात्र हे माहीत नव्हते. मचाण बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या 
योगायोगाने शिवलिंगावर पडल्या. याप्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकार्‍याचे व्रतही झाले आणि त्याच्याकरवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले.
एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहचली. शिकार्‍याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भिणी आहे, तू 
एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील. हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल. तेव्हा तू मला मार.' शिकार्‍याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी 
झाडांआड लुप्त झाली.
 
काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली. शिकार्‍याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले, की 'हे पारधी! मी एक 
कामातूर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल.'
शिकारीने तिलाही जाऊ दिले. दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली. शिकार्‍याला जणू सुवर्णसंधीच मिळाली. 
त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली, हे पारधी! मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते, यावेळी तू मला मारू नकोस.'
 
शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे. माझी मुले तहान-भुकेने व्याकूळ झाले असतील.
उत्तरादाखल हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर 
विश्वास ठेव. मी लगेच परत येईल.
 
हरिणीचा तो व्याकूळ स्वर ऐकून शिकार्‍याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही 
वेळाने एक धष्ट-पुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला.
पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दीनवाण्या स्वरात म्हणाला, 'हे पारधी! जर तू माझ्या आधी तीन हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस, म्हणजे त्यांच्या 
वियोगात मला एकही क्षणाचे दु:ख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा 
कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल.
 
मृगाचे बोलणे ऐकून शिकार्‍याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटना-चक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकविली. तेव्हा मृगाने सांगितले, ' माझ्या तीनही पत्नी येथून वचनबध्द होऊन 
गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे, मी त्यांच्यासमवेत तुझ्यासमोर हजर होतो.
उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवाने त्याच्या 
ह्रदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चात्ताप झाला.
 
थोड्याच वेळात मृग सपरिवार शिकार्‍यासमोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकार्‍याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. शिकार्‍याने त्यांना न मारता आपणही प्राण्यांची हिंसा न 
करण्याचे ठरविले.
 
देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणती झाल्याबरोबर देवी-देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिवरात्री व्रत घडल्यामुळे शिकार्‍याला मोक्षाची प्राप्ती झाली. जेव्हा 
मृत्यु काळात यमदूत त्याचे प्राण नेण्यासाठी आले तेव्हा शिवगणांनी त्यांना वापस पाठवले आणि शिकार्‍याला शिवलोकात घेऊन गेले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मंगळवारी हनुमान चालीसा पठण किती वेळा करावे?

सद्गुरु श्री गजानन महाराज आरती मराठी

आरती सोमवारची

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments