Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह - भाग २

Webdunia
६ सामर्थ्य परीस
 
॥ जगन्नाथीं पूरी । पुढें सेतुबंघीं । हनूमंतु दूत । देखीयेला ॥४२॥
॥ मर्कटा ह्मणोनी । हेटाळींतां जती । मच्छिंदर वानी आत्म-प्रौढी ॥४३॥
॥ वायुसूत-जती । वाग्युद्धें ताडनें । झोंबी हातघाई । संचरीती ॥४४॥
॥ वात पर्वतास्त्रें । हनूमंत बळी । मौळी मच्छिंदरें । शीणवीला ॥४५॥
॥ दुर्गा तळी दाबी । धरी मारुतीसी । अनीळ तातासी । ‘धांवे म्हणें ॥४६॥
॥ पुत्रार्थ अनीळू रस । वाहीला । ‘जती-श्रेष्ठ तूची । सोडी बाळू ॥४७॥
॥ परखी परीसू । लोहा सुर्वणातें । चोज किमयेचें । तज्ञ घेती ॥४८॥
॥ वायु-सूतू याची । ‘जती!कार्य करी । ख्रियांचिया राज्यी । जावोनियां ॥४९॥
॥ मार्गी ज्वालामुखी । हिंगळा-इंगळा । मच्छिंद्रा कमळा जाळू पाहे ॥५०॥
॥ आठीहि भैरवी । गदारोळ केला । युद्धा आव्हानिला । जतींद्र तो ॥५१॥
॥ भैरवी शस्त्रास्त्रें । ब्रह्मास्त्रें तयांची । चिमूटी भस्माची । बुंथी केली ॥५२॥
॥ चामुंडांचा भारू । चंड पुढें आला । मोहूनी वाराली । योगीयानें ॥५३॥
॥ हिंगळा तोषली । वरू देती झाली । समाधानें शांत शीतला ती ॥५४॥
॥ वायु योगें पंथू बारा मल्हारांसी । अम्बा प्रसादेंसी चाले वेगी ॥५५॥
॥ वेत्रालें वेताळें । भूतें जीं उदेलीं । स्पर्शास्त्रें तीं स्थानीं । खिळवीलीं ॥५६॥
॥ आडूलीं कुडाळीं । कोकणी तै येतां । काळीका देवता । आराधीली ॥५७॥
॥ ‘मंत्र काव्य’ गाई । ‘मंत्र नारायणी । कालिके वेताळा !। मान्य करां ॥५८॥
॥ पोटी उभयांच्या । मोठा क्रोधू आला । ‘शाबरी हा बेटा । कानीं फांटा ॥५९॥
॥ ‘शाबरी काव्यांते । नादरीले कोणी ?। जाळोनी शापोनी भस्म करूं ॥६०॥
॥ दोघेही म्हणती । तोचिं भस्म तेथें । सांचतें चिमूटी । अंगोपांगी ॥६१॥
॥ रुद्र, शिव, सूर्य । साह्यासी धांवती । उभयां रक्षीती । स्मित-हास्ये ॥६२॥
॥ ‘मच्छिंद्रा शाबरी । काव्यीं श्रेष्ठ मानूं । ‘श्रद्धायु सेवूत । ज्ञान सारे’ ॥६३॥
॥ विश्वे देवी श्रद्धा । गुरु-क्षेत्री तैसी । मंत्रीहि आपैसी । जडों द्यावी ॥६४॥
॥ ध्यावा ध्यानी, काव्यीं । धर्म नीति न्यायू । उदात्त विचारा । मनी ठायू ॥६५॥
॥ अनुभव-ज्ञानी । बाल ना शाबरी । संचारी मार्गाने । सत्य-ज्ञानू ॥६६॥
॥ भस्मू माया भासे । करी जो सहनू तपनू रक्षणू देहें मनें ॥६७॥
॥ क्रोधी आवरोनी । गात्रें संयमूनी । योगी तो कुशली । लीन ज्ञानी ॥६८॥
॥ देवां कालीसह । आराधीतो यती । काली वरू देती । कालांती ती ॥६९॥
॥ ओगरोनी सेवा । देवां, नाथा, पांथा, । विश्वे देवां ताता । बोळविलें ॥७०॥
॥ तदा गदा-तीर्थू । मच्छिंदर क्रमी । वीरभद्रा अढी । पडे त्यासी ॥७१॥
॥ राममंत्रे भस्मु । चिमूट फेकीतां । रुद्रास्त्रें झोडली वीरभद्रें ॥७२॥
॥ काळास्त्र काखोखी । वीरभद्र योजी । वासनीक योजी मच्छिंदरू ॥७३॥
॥ देखे युद्धकला । तोखे वीरभदरु । आशिर्वादू देई । मज्छिंदरा ॥७४॥
॥ येरीहि देवांनी । आसना विमानी । मनकर्णी स्थानी पोचविला ॥७५॥
॥ नऊ नारायणी । समाधि देखिल्या स्थितप्रज्ञी कृष्णा । तेथें दहा ॥७६॥
॥ सत्य लोक यात्रा । कैलास मानसू । वैकुंठ-साहसू । देवां संगे ॥७७॥
॥ भोगावती तीरी । वज्रावती अम्बा । रामें दाशरथी । स्थापीजेली ॥७८॥
॥ यात्रा द्वारावतू क्रमोनियां येई । अयोध्या नगरी । राज-योगी ॥७९॥
॥ पाशुपती राव । पाळी प्रजाजनू । राम दर्शनासी । रथी निघे ॥८०॥
॥ मूर्त मंदिरांत । धूर्त द्वारपाळ । राव अम्बारीत । सैन्यामाजी ॥८१॥
॥ मच्छिंदरी तोचि । हेतू होता साचा । राम दर्शनाचा । मूर्त जरी ॥८२॥
॥ सन्मानें राजाशी । द्वारपाळू नेई । कान-फांटा जोगी । आडवीला ॥८३॥
॥ मच्छिंद्रे शासीला । पाशूपतरायू । सेवका मलीदा । दंडू राया ॥८४॥
॥ रावें रामपदी । ललाट टेकीतां । स्पर्शास्त्र प्रेरीलें । जोगडयानें ॥८५॥
॥ पाशुपत-भाल । पदीं टेकीयेलें । तेथें चिकटले । भूमी भागी ॥८६॥
॥ मंत्री पंडितीहि । जधी शोधू केला । मच्छिंद्र-प्रभावू । भावियेला ॥८७॥
॥ कारुण्यें शरणू । जातां जांगियाते । विभक्त-मंत्रातें । जपीयलें ॥८८॥
॥ सूर्यासी जिंकोनी । मच्छिंदरे त्वरें । रामासि प्रार्थीले । दीन वाचे ॥८९॥
॥ ‘रामा धांवा वेगें । नामें उच्चारीतां । उद्धरणा करी । जपी-योगी ॥९०॥
॥ वरू देवोनियां । मंत्रा शाबरासी । मच्छिंद्रा भक्ताचें ब्रीदू रक्षी’ ॥९१॥
॥ प्रसादू लाहोनी । मान्यता मंत्रासी । रामें देतां जोगी । उल्हासला ॥९२॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

कालभैरवाष्टकम् Kalabhairava Ashtakam

Kotwal of Kashi काल भैरवाला काशीचा कोतवाल का म्हणतात?

Kaal Bhairav Ashtami 2024 भगवान कालभैरवाला प्रसन्न करण्याचे उपाय

आरती शुक्रवारची

Utpanna Ekadashi 2024: उत्पन्ना एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments