Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह - भाग ६

Webdunia
१५ गांठी भेटी (२) गोरक्ष - कानीफा
 
॥ पालखीसी भोई । सेवक चालती । हेलापट्टणासी । येती सारे ॥२०४॥
॥ जगन्नाथाहूनी । गोरक्षुहि येती । उभयो भेटती । नाथु-पंथी ॥२०५॥
॥ कानीफा प्रेरीती । विभक्तु मंत्राते । फले पक्व राशी । सांचतसे ॥२०६॥
॥ प्रौढी देखोनीया । गोरक्षु ना साहे । थाटु मिरवी तो । अमृतांचे ॥२०७॥
॥ सामर्थ्ये उभये । जेंदि दावियेले । मिठी परस्परे । होये क्षणी ॥२०८॥
॥ वृतांते आदेशें । गोष्टी परस्परां । निश्चिती मार्गाची तैशी जाली ॥२०९॥
॥ स्त्रियांच्या गांवासी । गोरक्षानें जावें । गोपीचंदाप्रती । कानीफानें ॥२१०॥
॥ अपूव स्वागत । गोपीचंदे केलें । कानीफा तें नेलें । वाडीयांत ॥२११॥
॥ शांत क्रोध करी । पाय चुरी हातें । सेवा कानीफाची परोपरी ॥१२॥
॥ मैनावती तैसी । सांभाळिते नीति । क्षमा; शांति, प्रीति । वरीतसे ॥१३॥
॥ उभां शिष्यांतें । कानीफा आश्वासी । शांत चित्तें म्हणे । ‘शुभ होय’ ॥१४॥
 
१६ जालंधर सुटका
 
॥ कानीफासी राये । दावियेली गर्ता । अश्वांच्या उत्कीरी । जालंधरू ॥१५॥
॥ कल्याणार्थ तदा । कानीफा तो वदें । पांच मृर्ती करी । राजया ! तूं ॥१६॥
॥ ‘हेम, रौप्य, ताम्र, । कांस्य, लोह, तेंवी । रचीं गर्तेवरी । एकू एकी ॥१७॥
॥ गर्तेवरी धावू । गोपीचंद घाली । घात योजियेला । कोणे ? वदा’ ॥१८॥
॥ जालंधर बोले । गोपीचंद सांगे । घावू घालतसे । लोह मूर्तू ॥१९॥
॥ जालंधरें शापें । मूर्ती भस्मु होत । गर्ता उत्कीरीत रावराणा ॥२०॥
॥ जालंधर नाथु । पाही गर्ते आंतु । कानीफा शरण । त्यासी जातु ॥२१॥
॥ शिष्यांतें आलिंगी । गुरुंसी वंदिती । गोपीचंदु तेवी । माता मैना ॥२२॥
 
१७ गोपीचंद तपस्या
 
॥ राया ! गीपीचंदा ! । तपस्येसी जावे । भिक्षा-पात्र घ्यावे । संगे तुम्ही ॥२३॥
॥ सांगे गुरुराजा । जालंधरा ओजा । ‘अहंकार बोजा । झडो द्यावा ॥२४॥
॥ लुमावती राणी । रडे दीनवाणी । तीसी समजावणी । होता पुरे ॥२५॥
॥ मुक्तचंद्र-पुत्र । राज्यासनी येई । गोपीचंदु यात्रा । चाले पायी ॥२६॥
 
१८ चंपावती भगिनी
 
॥ कौला बंगाल्यासी । पौलापट्टणासी । शिष्या गोपीचंदा । प्रजा पाहे ॥२७॥
॥ वार्ता राया गेही । चंपावती कानी । बंधूसी भगिनी । देखे स्वतां ॥२८॥
॥ गोपीचंदा नामें । जालंधरा कर्में । निंदिती ते वर्में । काढोनियां ॥२९॥
॥ पौली जो तिलकु- । चंदु नामें राया । चंपावति कांत । तोहि निंदी ॥३०॥
॥ बंधूसी तै अन्नु । चंपा पाठवीते । सेवीतसे ब्रम्हू । जाणोनी तें ॥३१॥
॥ निंदीती आप्तत्वें । चंपा राणीयेते । कटघारींनें । घातु । स्वयें करी ॥३२॥
॥ गोपीचंदु म्हणे । ‘जालंधरा आणूं । ‘भगिनीचा प्राणूं । देही घालूं’ ॥३३॥
॥ ‘जालंधर गुरु । येतील तोंवरू । प्रेतातें सांवरू । भगिनीच्या ॥३४॥
॥ ज्ञानी जालंधरु । धांवोनीया येती । गूरु-शिष्यां देखी । तिलकू तो ॥३५॥
॥ धांवे पायांपाशी । पावे तात्कालीकीं । तपोराशीं जपे । मंत्रपंक्ती ॥३६॥
॥ मृत्यंजय मंत्रे । संजीवन दिले । चंपा तिलकांसी । भेटवीले ॥३७॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

नारायणस्तोत्रम्

Tulsi Vivah 2024 Katha तुळशी विवाह कथा

Tulsi Vivah Mangalashtak तुळशी विवाह मंगलाष्टके

आरती बुधवारची

Dev Diwali 2024: देव दिवाळीला कधी, कुठे आणि किती दिवे लावायचे?

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments