Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री रेणुका मातेची प्रार्थना

Webdunia
रविवार, 12 फेब्रुवारी 2023 (12:32 IST)
अंबे एक करी, उदास न करी, भक्तास हाती धरी |
विघ्ने दुर करी, स्वधर्म-उद्धरी, दारिद्रय माझे हरी ||
चित्ती मुर्ती बरी, वर-अभय करी, ध्यातो तुला अंतरी |
वाचा शुध्द करी, विलंब न करी, पावे त्वरे सूंदरी ||१||
 
माते एक विरे, वर अभयकरे, दे तु दयासागरे |
माझा हेतु पुरे, मनात न उरे, संदेह माझा हरे ||
जेणे पाप सरे, कुबुध्दी विसरे, ब्रम्हैक्य-धी संचरे |
देई पुर्ण करे, भवाम्बुधी तरे, ऎसे करावे त्वरे ||२||
 
अनाथासी अंबे नको विसरु वो |
भवसागरी सांग कैसा तरु वो ||
अन्यायी मी हे तुझे लेकरु वो |
नको रेणुके दैन्य माझे करु वो ||३||
 
मुक्ताफ़लै: कुंकुम-पाट्लांगी |
सदेह तारानिक रैविभाती ||
श्री मुळपिठाचल चंडिकायां |
तां एकवीरां शरणं प्रपद्ये ||४||
 
सखे दु:खीताला नको दुखवू वो |
दिना बालकाला नको दुखवू वो ||
ब्रीदा रक्षी तु आपुल्या श्री भवानी |
ही प्रार्थना ऐकुनि कैवल्यदायनी ||५||
 
॥ सदानंदीचा उदयोस्तु ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रविवारी करा आरती सूर्याची

रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल

श्री गजानन महाराज भजन

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

कर्जतचे ग्रामदैवत सद्गुरु गोदड महाराज

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments