Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
स्वामी समर्थ सप्तशती अध्याय तिसरा
Webdunia
श्री गणेशाय नम: । ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा: ॥
दत्तात्रेयो हरि कृष्णो ।मुकुंदो आनंददायका । मुनी दिगंबरो बालो । सर्वज्ञो ज्ञानसागरा ॥१॥
दिगंबर मुने बाला । समर्था विश्व स्वामीने । परहंसा महाशून्या । महेश्वासा महानिधे ॥२॥
ऊँ हंस हंसाय विद्महे । परमहंसाय धिमही । तन्नो दत्त प्रचोदयात् ॥३॥
ऊँ शून्य शून्याय विद्महे । परमशून्याय धिमही तन्नो परब्रह्म प्रचोदयात् ॥४॥
ऊँ दत्तात्रेयाय विद्महे । योगीश्वराय धिमही । तन्नो दत्त प्रचोदयात् ॥५॥
ऊँ स्वामी समर्थाय विद्महे । परम अवधूताय धिमही । तन्नो महादत्त प्रचोदयात् ॥६॥
खंडोबाचे देवळात । राहू लागले स्वामी समर्थ । अलिखान घेऊनी जात । चोळाप्पा घरी स्वामींना ॥७॥
चोळाप्पा स्वामी भक्त । त्याचे घरी समर्थ राहत । अनेक लीला करीत । निष्ठा पाहती भक्ताची ॥८॥
सिध्द अन्न गाईसी घालिती । कडधान्ये गुरांना चारिती । घरात शौचास बैसती । ऐसे छळती तयालागी ॥९॥
विविध प्रकारे छळती नित्य । वरी शिवीगाळ करीत । वस्तू वाटूनी टाकीत । ऐसे छळती भक्तासी ॥१०॥
मालोजीराजे प्रतिवर्षी । गाणगापुरी जाऊनी सेवा करिती । स्वप्नी नृसिंह सरस्वती । म्हणती पाहा काय ते ॥११॥
मी आलो तुझ्या गावात । तू का येसी गाणगापुरात । राजसी विश्वास होत । समर्थ दत्त म्हणोनिया ॥१२॥
एक मोठे वडाचे झाड आहे आणि झाडाखाली स्वामी समर्थ बसलेले आहेत.
येऊनी चोळाप्पाचे घरी । राजा दत्ताचे पाय धरी । म्हणे गुरुदत्त अवतारी । आपणा मी ओळखिले ॥१३॥
तैपासोनी समर्थ । कधी कधी जाती राजवाडयात । राजासही त्रास देत। विविध प्रकारे करोनिया ॥१४॥
सुवर्ण अलंकार विहिरीत टाकावे । क्रोधे राजासी मरावे । वाडयातील स्त्री - पुरुषांशी छळावे । ऐसे करिती श्री स्वामी ॥१५॥
परी निष्ठावान भक्त । आपुली निष्ठा न सोडीत । सर्व त्रास साहित । श्री गुरुकृपे कारणे ॥१६॥
कधी राहती राजवाडयात । कधी वटवृक्ष स्थानात । कधी चोळाप्पाचे घरात । ऐसे राहती श्री स्वामी ॥१७॥
काशीपासोनी रामेश्वरपर्यंत ।दुरदुरोनी लोक येत । गर्दी जव वाढू लागन । वटवृक्ष स्थानी राहिले ॥१८॥
समर्थ होता क्रोधित । थरथरा कापती भक्त । एकेका चोपुनी काढीत । ऐसा क्रोध स्वामींचा ॥१९॥
मालोजीराजे भोसले । स्वामी सेवा करु लागले । एकदा भेटीसी आले । अंबारीत बैसोनिया ॥२०॥
स्वामी जवळी जावोन । केला दंडवत प्रणाम । दिली श्रीमुखात ठेवून । पागोटे उडाले दूर ते ॥२१॥
घातल्या शिव्या भरपूर । दिले हाकलोनी सत्वर । ऐसे राजे पैशास शेर। बाजाराता विकतो मी ॥२२॥
पाहोनी उग्र अवतार । भक्त पळाले दूरवर । ऐसा स्वामींचा व्यवहार । अक्कलकोटी चालतसे ॥२३॥
नृसिंहवाडीचे भक्तगण । आले दर्शना कारण । चरणी घालोनी लोटांगण । पुसती स्वामीलागी ते ॥२४॥
स्वामी आपण कोण । कोठूनी झाले आगमन । स्वामीही प्रसन्नवदन । वदती पाहा काय ते ॥२५॥
मूळपुरुष वडाचे झाड । दत्तनगर देती उत्तर । ऐकोनी जयजयकार । भक्त करिती तेधवा ॥२६॥
तैसेची एका भक्ता सांगत । मी नृसिंहभान असत । काश्यप गोत्र माझे म्हणत । मीन राशी आमुची ॥२७॥
ऐशा लीला करीत । अक्कलकोटी राहती समर्थ । त्यांचे चरित्र अद्भुत । संक्षिप्त रुपे पाहतसो ॥२८॥
एकदा कलकत्याहून । दर्शना येती भक्त दोन । एक पारशी एक युरोपियन । दर्शन घेती स्वामींचे ॥२९॥
काली रुपात दर्शन । देती समर्थ तयालागोन । आश्चर्यचकित होवोन । जाती पाहा दोघे ते ॥३०॥
म्हणती समर्थ निराकार । देवी देवता रुपाकार । पूर्णब्रह्म परात्पर । अक्कलकोटी राहिले ॥३१॥
होऊनी अत्यंत प्रभावित । राहती सेवा करीत । पाहूनी स्वामी प्रसन्न चित्त । पुसती पाहा काय ते ॥३२॥
स्वामी आपण कोण । येणे झाले कोठून । स्वामी समर्थ प्रसन्न । वदती पाहा काय ते ॥३३॥
मूळपुरुष मी निराकार । दत्तात्रेय दिगंबर । अवधूतरुपे संचार । करीत असतो भूवरी ॥३४॥
कर्दळी वनातून सांप्रप्त । निघालो पाहा फिरत फिरत । बगाल कलकत्ता पाहत । बद्रीकेदार पाहिले ॥३५॥
तेथूनी पाहिले हरिव्दार । अयोध्या व्दरका पंढरपुर । हुमणाबाद बेगमपूर । पाहोनी येथे आलो मी ॥३६॥
तेव्हापासून अक्कलकोटात । आहे पाहा येथे राहत । दत्तावधूत स्वामी समर्थ । ऐसे म्हणती मजलागी ॥३७॥
ऐकोनी ऐसा वृत्तान्त । जयजयकार करिती भक्त । म्हणती दत्त साक्षात । येऊनी येथे राहिला ॥३८॥
गाणगापुरातील भक्त । अक्कलकोटी दर्शना येत । तयासी म्हणती स्वामी समर्थ । नृसिंह सरस्वती मी असे ॥३९॥
मी श्रीपाद श्रीवल्लभ । होतो कुरवपुरी राहत । नृसिंह सरस्वती रुपात । गाणगापुरात मी होतो ॥४०॥
कर्दळीवनात मीच गेलो । तेथूनी पुन्हा परतलो । सांप्रत येथे राहिलो । जगदोध्दारा कारणे ॥४१॥
ऐसे ऐकोनी वचन । भक्त पावती समाधान । म्हणती गुरु दयाळ पूर्ण । पुन्हा पाहा प्रकटले ॥४२॥
गाणगापुरात काही भक्त । होते अनुष्ठान करीत । तयासी स्वप्नी श्री दत्त । सांगती पाहा काय ते ॥४३॥
अक्कलकोटी सांप्रत । समर्थरुपे मी राहत । जावोनी सेवा त्वरित । श्री स्वामी समर्थाते ॥४४॥
ऐसे आदेश होत । सेवकांसी गाणगापुरात । गाणगापुराहूनी नित्य । लोक येवो लागले ॥४५॥
गिरनार पर्वती एक भक्त । दत्त दर्शनार्थ तप करीत । त्यासी दृष्टांत होत । श्रोते तुम्ही अवधारा ॥४६॥
दत्त तयासी सांगत । जावे अक्कलकोटात । स्वामी समर्थ रुपात । सांप्रत आहे मी तेथे ॥४७॥
ऐसे होती दृष्टांत । तपस्वी आणि योग्यांप्रत । अक्कलकोटी महिमा वाढत । श्री स्वामी समर्थांचा ॥४८॥
दूरदुरोनी तडी तापसी । येती स्वामी दर्शनासी । पूर्ण परब्रह्म दत्तात्रेयासी । पाहोनी तृप्त होती ते ॥४९॥
ठाकूरदास गाणगापुरात । श्री दत्ताची सेवा करीत । त्यासी दृष्टांत होत। अक्कलकोटी आहे मी ॥५०॥
म्हणोनी अक्कलकोटी येत । स्वामी दर्शन करण्या जात । परी मनामाजी म्हणत । पाहू सामर्थ्य स्वामींचे ॥५१॥
दत्त पादुका गाणगापुरी । वहावया त्यावरी कस्तुरी । ती घेऊनी बरोबरी । अक्कलकोटी पोचले ॥५२॥
करिता समर्थांसी वंदन । हमारा कस्तुरी लाव म्हणोन । केले स्वामींनी आज्ञापन । भक्त विस्मित होत असे ॥५३॥
हेची दत्तात्रेय समर्थ । खूण त्यासी पटत । तात्काळ कस्तुरी अर्पित । श्री स्वामींसी तेधवा ॥५४॥
ऐसे स्वामी समर्थ । लीला करिती अनंत । नित्य नूतन महिमा होत । अक्कलकोटा माझारी ॥५५॥
गोविंदराव गाणगापुरात । होते पादुका सेवा करीत । त्यांसी दृष्टांत होत । श्रोते पाहा काय तो ॥५६॥
गाणगापूर गर्भ मंदिरात । जेथे निर्गुण पादुका असत । श्री स्वामी सम्रर्थ । बैसले तेथे पाहे तो ॥५७॥
स्वामी तयासी म्हणत । हे माझेची स्थान असत । परी सदेहाने सांप्रत । अक्कलकोटी आहे मी ॥५८॥
पाहोनी ऐसा दृष्टांत । गोविंदराव अक्कलकोटी येत । श्री स्वामींसी निवेदीत । दृष्टांत सारा तेथवरी ॥५९॥
तव म्हणती स्वामी समर्थ । पूर्वी होतो गाणगापुरात । तैसेची गिरनार पर्वतात । होतो आम्ही जाण पा ॥६०॥
माहूरगड अबू पर्वत । मेरु पठार हिम पर्वत । औदुंबर नृसिंहवाडीत । होतो पूर्वी अवधारा ॥६१॥
तैसेची कर्दळीवनात । श्रीशैल सुब्रमण्य स्थानात । आणि निलगिरी पर्वतात । पूर्वी राहिलो होतो मी ॥६२॥
ऐसे सांगती समर्थ । विस्मित होती भक्त ।म्हणती श्रीपाद श्रीवल्लभ । पुन्हा ऐसे प्रकटले ॥६३॥
अजानुबाहू भव्य शरीर । टोपी शोभे मुकुटाकार । अवधूत दत्त दिगंबर । लोकोध्दारा प्रकटले ॥६४॥
योगी तपस्वी संन्यासी । दुरोनी येती दर्शनासी । ब्रह्मप्राप्ती तयांसी । स्वामीकृपे होत असे ॥६५॥
सीताराम नामे भक्त । होते योगसाधना करीत । परी समाधी न लागत । येती दर्शना कारणे ॥६६॥
स्वामी कृपादृष्टी करीत । योग्यासी समाधी लागत । आठ तासपर्यंतस । समाधी त्यांसी लागतसे ॥६७॥
ऐसा महिमा अगाध । वर्णिता थकती वेद । स्वामी समर्थ श्री दत्त अक्कलकोटी राहिले ॥६८॥
म्हणोनिया दत्तगिरी । श्री गुरुचरित्र विस्तारी । समर्थ स्वामी अवतारी । अक्कलकोटी राहिले ॥६९॥
हा ग्रंथ नव्हे अमृत । श्री स्वामींची वाड्मय मूर्त । पठणे दर्शन साक्षात । श्री स्वामींचे होत असे ॥७०॥
॥ अध्याय तिसरा ॥
॥ओवी संख्या ७०॥
स्वामी एका शिळेवर बसलेले आहेत. उजव्या हाताला साईबाबा व डाव्या हाताला गजानन महाराज बसले आहेत.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दुसरा
स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पहिला
आज एकादशीचा दुर्लभ इंद्र योग, या 3 राशींवर प्रभू विष्णुंची कृपा राहील
दशरथ कृत शनि स्तोत्र
वरुथिनी एकादशी 2024 काय करावे- काय करु नये
सर्व पहा
नवीन
Valga suktam in marathi नजरदोष, शत्रूपीडा आणि दारिद्रय यापासून मुक्ती मिळेल, वल्गा-सूक्त पठण करा
कैलास शिव मंदिर एलोरा
somvar mahadev mantra jap सोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप
आरती सोमवारची
महादेव आरती संग्रह
सर्व पहा
नक्की वाचा
Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
श्री गजानन महाराज बावन्नी
Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात
छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा
पुढील लेख
स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दुसरा
Show comments